आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...तर शरद पवारही 'एनडीए'त सामील होतील- मनोहर जोशी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद मोठ्या प्रमाणावर यूपीएमधील घटक पक्षही प्रंचड नाराज आहेत. अशा स्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादीतील मतभेदाला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा एक दिवस एनडीएत सामील होतील, असे भाकीत माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांनी केले आहे.
होय, एक दिवस शरद पवारही एनडीएत सामील होतील. पण त्यांचे मन वळवणे अवघड असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आडवाणींचे भाकीत घाईचे- माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांनी २०१४ साली भाजपा किंवा काँग्रेसचा पंतप्रधान नसेल, असे भाकीत वर्तवले असले तरी ते घाईचे आहे, असे मत संघाचे जेष्ठ पदाधिकारी व माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी व्यक्त केले आहे.
ते म्हणाले, आडवाणी यांनी आताच असे बोलणे घाईचे ठरेल. लोकसभा निवडणुकीला तब्बल दोन वर्षे अवधी आहे. याशिवाय गुजरात, मध्यप्रदेश सारख्या मोठ्या राज्याच्या विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. अशा स्थितीत मत करणे घाईचे ठरेल.
केशूभाई पटेल यांनी वेगळा पक्ष काढल्याने गुजरातमधील नरेंद्र मोदी यांच्या भाजपला याचा फटका बसेल असेही वैद्य यांनी म्हटले आहे. तसेच यावरुन संघातील एक गट मोदींच्या विरोधात कार्यरत असल्याचे स्पष्ट होत आहे.
ना सरकारचा धाक, ना पोलिसांचा वचक, शिवसेना नेते मनोहर जोशी यांची टीका