आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी यांच्यासोबत प्रचाराला यंदाही शरद पवार यांची नाच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यातील छुपे युद्ध यापुढेही सुरूच राहणार आहे. लोकसभेप्रमाणेच आगामी विधानसभा निवडणुकीत पवार हे राहुल गांधी यांच्याबरोबर प्रचार करणार नाहीत, असे गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

लोकसभा निवडणुकीत मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची संयुक्त प्रचार सभा झाली होती. त्या वेळी शेवटच्या क्षणी पवारांनी प्रचार सभेकडे पाठ फिरवली होती. या सभेला खरे तर काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी येणार होत्या, मात्र प्रकृती चांगली नसल्याने ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाला. त्यांच्याऐवजी राहुल यांनी सूत्रे हाती घेण्याचा निर्णय घेतला. मात्र ‘ज्युनियर’ राहुलच्या शेजारी बसण्याची वेळ येऊ नये म्हणून पवारांनी अखेर सभेला जाण्याचा निर्णय घेतला होता.

विधानसभेत तरी पवार राहुल गांधींच्या सोबत प्रचार करणार का? या प्रश्नावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, शरद पवार हे सीनियर नेते आहेत. ते त्यांच्याशी समकालीन किंवा ज्येष्ठ अशा काँग्रेसच्या नेत्यांसोबतच प्रचार करतील. राहुल गांधींसोबत राष्ट्रवादीचे युवा नेते असतील, यात गैर नाही. पवारांची ही पहिल्यापासूनची भूमिका आहे.’

पंतप्रधानपदासाठी विरोध
राहुलगांधींना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करण्यास पवारांनी नेहमीच विरोध केला होता. यूपीएचे प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे काँग्रेसला बॅकफूटवर जावे लागले होते. पवारांच्या या विरोधाचा राहुलच्या मनातही कायम राग आहे. हा राग त्यांनी मुख्यमंत्रिपदी पृथ्वीराज चव्हाण यांची नियुक्तीमध्ये पुढाकार घेऊन काढला. राष्ट्रवादीच्या वादग्रस्त निर्णयाची जाहीर वाच्यता तर कराच, पण त्यांच्या फायलीही दाबून ठेवा, अशा राहुल यांच्याच मुख्यमंत्र्यांना सूचना होत्या, असे बोलले जाते.

कोल्हापूरला सभा
राष्ट्रवादीकाँग्रेसची विधानसभा निवडणुकीसाठी पहिली प्रचार सभा १६ सप्टेंबर रोजी कोल्हापूरला होणार आहे. गांधी मैदान येथे दुपारी वाजता ही सभा होणार असून पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ, आर.आर.पाटील यांच्यासह पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.