आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आघाडीच्या प्रचाराची धुरा शरद पवारांकडे सोपवा;एकमुखी नवी मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लोकसभेत काँग्रेस आघाडीचा राज्यात दारुण पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसला 4, तर काँग्रेसला अवघ्या 2 जागांवर समाधान मानावे लागले. या पार्श्वभूमीवर ऑक्टोबरमधील विधानसभा निवडणुकीत आघाडीचे काही खरे नाही, अशी चिन्हे दिसत आहेत. हे लक्षात घेता विधानसभेसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या प्रचाराची धुरा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपवावी, अशी नवी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुढे येत आहे. त्यामुळे पवार यावर काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

राष्ट्रवादी हा नेत्यांचा पक्ष असून त्यांच्याकडे अपेक्षित अशी कार्यकर्त्यांची मोठी फळी नाही. याउलट काँग्रेसला आजही राज्यात राष्ट्रवादीपेक्षा मोठा जनाधार असून कार्यकर्तेही मोठय़ा संख्येने त्यांच्याकडे आहेत. आदर्श घोटाळय़ामुळे अशोक चव्हाण यांना प्रचारापासून दूर ठेवले गेले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना यांच्या हाती काँग्रेसने सूत्रे दिली खरी, पण त्यांना आपला प्रभाव पाडता आलेला नाही.

या पार्श्वभूमीवर शरद पवारांसारख्या अनुभवी नेत्याकडे सूत्रे दिल्यास त्यांचा आघाडी खूप मोठा फायदा होईल. पवारांना महाराष्ट्र तोंडपाठ आहे. त्यांच्यासारखा या घटकेला राज्यात दुसरा नेता नाही. त्यामुळे ही मागणी समोर आल्याची चर्चा आहे.

एलबीटी, टोल, मराठा आरक्षणावर निर्णय हवेत
सध्याची परिस्थिती पाहता दोन्ही काँग्रेसला एकत्र विधानसभा निवडणूक लढवण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, निवडणूक लढवताना दोन्ही काँग्रेसनी प्रचारात वेगवेगळी चूल मांडल्यास एकत्रित परिणाम दिसणार नाही. लोकसभेतील निकालांवर नजर टाकली असता विधानसभेच्या 288 पैकी 242 मतदारसंघांमध्ये आघाडी पिछाडीवर पडल्याचे वास्तव आहे. या वास्तवाला सामोरे जाऊन आतापासून तयारीला लागायला हवे. एलबीटी, टोल व मराठा आरक्षण असे महत्त्वाचे निर्णय तातडीने घ्यायला हवेत, अशी स्वत: पवारांचीही भूमिका आहे.