आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar News In Marathi, Farmer Suicide, Facebook, Divya Marathi

पिचलेल्या बळीराजासाठी शरद पवारांनी केलेल्या आवाहनाचा नेटिझन्सकडून समाचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोन्यासारखं पीक हातातून गेलं, त्यामुळे काही माणसांच्या मनावर नकारात्मक परिणाम होतो. या मानसिकतेतून काही लोकांनी आत्महत्या केल्यात; पण आत्महत्येनंतर त्यांची शेती ही त्यांच्या कुटुंबाची असते, मग कुटुंबाला अडचणी येणार नाहीत का? संकटं येत असतात. त्याला धैर्यानं सामोरं जावं लागतं. या परिस्थितीवर मात करण्यासाठी तसेच लोकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी काम करावं लागणार आहे. त्यामुळे कृपा करून टोकाचा निर्णय घेऊ नका. -शरद पवार (फेसबुक पेजवर)


प्रणव जातकर : साहेब... पण आत्महत्या करणारा शेतकरी तुमची ही पोस्ट वाचणार आहे का?
दत्ता शेलार : या अस्मानी संकटात खरी गरज आहे, शेतक-यांना धीर देऊन उभे करण्याची. राजकारण बाजूला ठेवत सहकार्याची, खंबीरपणे साथ देण्याची.
समीर शेख : नुसती भाषणे आणि खोटी आश्वासने नकोत. जर कृषिमंत्री असूनदेखील शेतक-यांच्या भावना समजून घेऊन मदत करत नसाल, तर मदत जाहीर केली तरी त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त रक्कम नेत्यांच्याच घशात अडकणार. त्यामुळे योग्य तो निर्णय घ्यावा हीच विनंती.
श्याम तागडे : साहेब, मी आपल्या मताशी 100% सहमत आहे; पण आजची वाढलेली महागाई, शेतीच्या उत्पादनावर होणारा खर्च, गारपिटीसारखी अस्मानी संकटे आणि शेतीमालाचे पडलेले भाव या सर्वांचा ताळमेळ बसत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करत आहेत.
मयूर कासार : शेतकरी मरण्याची वाट कशाला पाहता? आपल्या कुटुंबातील व्यक्ती समजून लवकर मदत का करत नाहीत? थोडी फार माणुसकी आहे की नाही, का त्यातही भ्रष्टाचार करण्याचा विचार आहे?
शिल्पा चिंचखेडे : महागाई वाढवणारे शरद पवार....
श्याम नाईकवाडी : जय महाराष्ट्र साहेब.. एक गोष्ट आजही नाही समजत. घोटाळ्यांची रक्कम इतकी मोठी असते, तरीही कशी जिरवली किंवा पचवली जाते. अहो साहेब, देशात जे घोटाळे झाले त्यांची रक्कम वसूल केली, तर देशातील प्रत्येकाच्या वाट्याला किमान दोन कोटी रुपये मिळतील. मग काय भीती.. कितीही गारा पडल्या काय अन् सुनामी आली काय?
रवींद्र एस. वेंगुर्लेकर : सर्व जण फक्त उपदेशच करणार. निवडणुकीवर करोडो रुपये खर्च करतील. उमेदवारांकडून करोडो रुपये घेतील; पण शेतक-यांसाठी काही करायचे तर म्हणे आचारसंहिता !
सुदर्शन कवाळे : हे काय देणार? आपलेच घेऊन आपल्यालाच देणार... त्यासाठी राजा हरिश्चंद्रासारखे नेते व्हायला पाहिजेत. नुसता जाणता राजा म्हणवून घेणारे नव्हेत !
संतोष पांडे : माणसांच्या मनावर नकारात्मक परिणाम होतो. शेतकरी तुमची पोस्ट वाचेल काय?