आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar News In Marathi, Narendra Modi, BJP, Nationalist Congress

नरेंद्र मोदीविरोधासाठीच शरद पवार यांनी घसरवली पातळी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्‍ट्राचे संयमी आणि पुरोगामी नेतृत्व अशी शरद पवार यांची ओळख. ते कधीच आक्रस्ताळी किंवा पातळी सोडून विधान करत नाहीत. पवार यापूर्वी कधी नरेंद्र मोदी किंवा गुजरात मॉडेलविषयी फार बोलल्याचा अनुभव नाही. मात्र गेल्या काही दिवसांत, प्रचारसभांच्या रणधुमाळीत त्यांनी केवळ मोदी एके मोदींनाच लक्ष्य केल्याचे दिसून येते.


कृषी विषयाची उत्तम जाण असलेले नेते म्हणूनही पवार ओळखले जातात. गुजरात विकास मॉडेलवर देशात काही वर्षे वाद झडत आहेत. परंतु पवारांनी या मॉडेलवर कधीच टीका केली नव्हती. उलट गुजरात मॉडेल ‘रिझल्ट ओरिएंटेड’ असल्याचे ते म्हणत राहिले.


बाळासाहेब ठाकरे पवारांना बारामतीचा म्हमद्या म्हणायचे. कारण सर्वसमावेशक राजकारणी म्हणून पवारांची ओळख होती. त्याच पवारांनी गुजरात दंगलीविषयी मोदींना क्लीन चिट दिली होती. मात्र निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटताच पवारांची भाषा बदलली. रविवारच्या जालन्यातील सभेतही पवारांनी ‘मोदींचे डोके फिरले आहे,’ असे वक्तव्य करत खालची पातळी गाठली. पवार आणि मोदी यांची गुप्त भेट झाल्याची बातमी आली तेव्हा राजकारणात कोणी अस्पृश्य असू नये, असे ते म्हणत राहिले.


मोदी लाटेचा देशभर बोलबाला आहे. त्यांचा प्रभावी मुकाबला करायला ‘यूपीए’कडे कोणी नाही. त्यामुळे ही मोहीम काँग्रेसने आता शरद पवारांवर सोपवली असावी. म्हणूनच बारामतीची अनुभवी तोफ दिवसेंदिवस मोदी या निशाण्यावर आग ओकत आहे, असे राजकीय विश्लेषकांना वाटते.


4 फेब्रुवारी : मुंबई
शेजारच्या राज्यातले मुख्यमंत्री विकासाच्या गप्पा मारत असतात. मात्र, याच राज्यात अल्पसंख्याकांचे पडलेले खून विसरणे कठीण आहे.
23 मार्च : नवी मुंबई
ज्या माणसाला देशाचा इतिहास माहिती नाही, तो माणूस देश कसा काय चालवणार?
24 मार्च : सातारा
गुजरात दंगलग्रस्तांची चौकशी करायला न जाणा-या व्यक्तीच्या हातात सत्ता देऊ नका.
26 मार्च : पुणे
देश जातमुक्त करायचा आहे. त्यासाठी मोदींसारख्या सांप्रदायिक प्रवृत्तींना खड्यासारखे बाजूला ठेवा.
28 मार्च : नाशिक
‘दुष्काळग्रस्त महाराष्‍ट्राला दिलेली मदत परत मागणा-या नेत्याला तुम्ही मत देणार का?’