आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sharad Pawar News In Marathi, NCP, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवडणुकीची रणधुमाळी: शरद पवारांचा पक्ष आहे मोठा, पण सक्षम उमेदवारांचा तोटा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सलग तीन वेळा म्हणजे गेली १५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांविरोधात सध्या लोकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे मत माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नोंदवले आहे. या मताशी दोन्ही काँग्रेसमधील नेतेही सहमत झाले असावेत, असा अनुभव सध्या तरी येत आहे. त्यामुळेच काँग्रेसप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सक्षम उमेदवारांची वानवा जाणवत आहे. राज्यात नंबर वन पक्ष असल्याचा दावा करणा-या राष्ट्रवादीवर विधानसभेच्या तोंडावर ओढावलेली ही नामुष्की पवारांसाठी चिंतेचा विषय बनली आहे.

२००९ च्या जागावाटपानुसार काँग्रेसच्या वाट्याला १७४, तर राष्ट्रवादीला ११४ जागा होत्या. मात्र, राष्ट्रवादीला आता किमान १३० जागा हव्या आहेत. काँग्रेस ११ जादा देण्यास तयार असताना राष्ट्रवादीला मात्र १६ जागा वाढवून हव्या आहेत, पण राष्ट्रवादीकडे आलेल्या इच्छुकांच्या अर्जावर नजर टाकली असता सक्षम उमेदवारांचे फारसे अर्ज आलेले दिसत नाहीत. मागील वेळी वजियी झालेल्या उमेदवारांकडून अर्ज आले असले, तरी पक्षाच्या अपेक्षेप्रमाणे गेल्या वेळी दुस-या किंवा तिस-या क्रमांकावर असलेल्या उमदेवारांनी उमेदवारीसाठी फारसा रस दाखवलेला नाही.

पवार- तटकरेंचाच वरचष्मा
लोकसभेतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचाच पक्षावर वरचष्मा असल्याचेही यामागे कारण आहे. छगन भुजबळ, जयंत पाटील, गणेश नाईक, भास्कर जाधव, बबनराव पाचपुते यांसारखे नेते अडगळीत पडल्यात जमा आहेत. त्यामुळेच यापैकी काही जण शिवसेना व भाजपच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती आहे. आपले नेतेच जर राष्ट्रवादीत राहणार नसतील, तर पक्षात आपल्याला विचारणार कोण, या भीतीने ब-याच इच्छुक सक्षम उमदेवारांनी अर्जच दिलेले नाहीत.

भविष्याच्या िचंतेमुळे राष्ट्रवादीत निराशा
एकवेळ काँग्रेस सत्तेविना राहू शकते, पण राष्ट्रवादीचे तसे नाही. हा पक्ष म्हणजे सतत सत्तेत राहणा-यांचा आहे. सत्तेवनिा बाहेर बसण्याची कल्पनाच ते सहन करू शकत नाहीत. भविष्याचा वेध घेता आघाडी सरकार पुन्हा सत्तेवर येण्याची िचन्हे दिसत नसल्याने राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेण्यास सक्षम उमेदवार इच्छुक नसल्याचे त्यांचे निकटवर्तीय खासगीत सांगत आहेत.

लवकरच पक्षत्याग
अस्वस्थ नेत्यांपैकी आजपर्यंत काेणीही राष्ट्रवादीला सोडचठि्ठी दिलेली नसली, तरी काही दिवसांमध्ये हे नेते महायुतीत दाखल होतील, अशी चर्चा आहे. महानंदच्या संचालिका वैशाली नागवडे या पुणे परिसरामधून उमेदवारी अर्ज दाखल करतील, असे सांगण्यात येत होते; पण त्यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतल्याचे बोलले जाते. तसेच सावंतवाडीमधूनही माजी आमदार शिवराम दळवी यांनी इच्छुक उमदेवारांमधून माघार घेतल्याचे सांगितले जाते.