आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sharad Pawar News In Marathi, NCP, Gopinath Munde, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीडमध्ये मुंडे कुटुंबीयांविरुद्ध उमेदवार देणार नाही - शरद पवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बीड लोकसभा जागेच्या पोटनिवडणुकीत मुंडे कुटुंबातील कुणी सदस्य उभा राहिल्यास त्याच्या विरोधात राष्ट्रवादी उमेदवार उभा करणार नाही, असे शरद पवार यांनी शनिवारी स्पष्ट केले. येथे आयोजित सर्वपक्षीय शोकसभेत पवार बोलत होते.

या वेळी उपस्थित गृहमंत्री राजनाथसिंह, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले, विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस आदींनीही मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला.मुंडे यांनी कारखानदार, शेतकरी, कामगारांच्या हिताची नेहमीच भूमिका घेतली. ते सतत संघर्षरत राहिले. समाजातील सर्व स्तरातील लोकांना त्यांनी एकत्र आणण्याचे मोठे काम केले. मुंडे कधी वेळ पाळत नसत. कदाचित त्यामुळेच राष्ट्रवादीच्या घड्याळाबरोबर त्यांचे जुळले नसावे, असे सांगत पवार यांनी आठवणी सांगितल्या.

राजनाथसिंह म्हणाले, प्रमोद महाजन यांच्या हत्येनंतर पोकळी निर्माण झाली होती. मुंडे यांनी ती भरून काढण्याचा प्रयत्न केला. आता भाजपमध्ये निर्माण झालेली पोकळी पंकजा भरून काढतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, प्रमोद महाजन यांच्यानंतर मुंडे यांच्या रुपाने आम्हाला आधार होता. महाजन यांच्यामुळे भाजपशी आमची ओळख झाली. मुंडे यांना उशिरा येण्याची सवय होती. म्हणून आजही ते येतील असे वाटते, अशा शब्दांत ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्या. विनायक मेटे, महादेव जानकर, बाळा नांदगावकर यांनीही यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी सांगून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.