आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारही हाफीजप्रमाणे बरळू लागलेत; शिवसेनेच्या मुखपत्रातून टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेसुद्धा पाकिस्तानच्या हाफीज सईदप्रमाणे काहीही बेताल बरळू लागले आहेत’, अशी टीका बुधवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखातून करण्यात आली.

सोशल मीडियावर महापुरुषांचा अवमान करण्याच्या घटनेने राज्यभर तणाव निर्माण झाला होता. पुण्यात एका अभियंत्याची हत्या झाली. त्यावर ‘केंद्रात मोदींची सत्ता आल्यानंतर धर्मांध शक्तींनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे,’ अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली होती. त्याचा ‘सामना’तून समाचार घेण्यात आला. अग्रलेखात म्हटले आहे की, शरद पवार हे कधी काय बोलतील याचा नेम नाही. पुण्यातील हत्येशी मोदी सरकारचा काय संबंध? ही जबाबदार राज्य सरकारची आहे. राज्यात गृहमंत्री पवारांच्याच पक्षाचा आहे. अशी हत्या होणे हे राज्य सरकारचे अपयश आहे.’
राष्ट्रवादी- शिवसैनिकांत ‘सामना’
‘सामना’तून पवारांवर झालेली टीका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना झोंबली. त्यांनी बुधवारी दुपारी ‘सामना’च्या प्रभादेवी कार्यालयावर मोर्चा काढला. मात्र याबाबत माहिती मिळताच शिवसैनिकांनीही त्याठिकाणी धाव घेतल्याने दोन्ही गटांत बाचाबाची झाल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तणाव निवळला.