आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिक्की प्रकरणी शरद पवारांचे मौन, पंकजांविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या कथित 206 कोटी रूपयांच्या चिक्की व इतर साहित्य खरेदी प्रकरणी त्यांच्यावर आरोप झाले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर बोलण्यास नकार दिला आहे. एवढ्या छोट्या मुद्द्यावर मी बोलणार नाही असे सांगत चिक्की प्रकरणावर पवारांनी मौन बाळगणे पसंत केले. मात्र, त्याचवेळी पवारांनी रज पुरोहित यांच्या कथित स्टिंगवर प्रतिक्रिया दिली.
राज पुरोहित यांची प्रतिक्रिया म्हणजे त्या पक्षात सध्या असलेली खदखद स्पष्ट करते असे सांगत भाजपातील सावळ्या गोंधळावर बोट ठेवले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर पंकजा मुंडेंविरोधात चिक्की वाटप आंदोलन केले. पंकजा जोपर्यंत निर्दोष सुटत नाहीत तोपर्यंत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी युवक राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. अहमदनगर, परभणी, औरंगाबाद, पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामती येथे पंकजा मुंडेंविरोधात आंदोलन करण्यात आले.
चिक्की घोटाळ्याविरोधात कोल्हापुरात रास्ता रोको
राज्याच्या महिला-बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या खात्यातील चिक्की घोटाळ्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आजपासून राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन सुरू केले. राज्यातील प्रमुख शहरे आणि जिल्ह्यांच्या ठिकाणी हे आंदोलन होईल. कोल्हापूर शहरात खासदार धनंजय मंडलिक आणि माजी मंत्री हसन मुश्रीफही युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांच्यासह या आंदोलनात सहभागी झाले होते. पुलाची शिरोली (सांगली फाटा) येथे कार्यकर्त्यांनी पुणे-बंगळुरू महामार्ग अडवून निषेध नोंदवला. के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, राजेश लाटकर, आदिल फरास, प्रदीप पाटील-भुयेकर आदी कोल्हापूर शहर-जिल्हा पदाधिकारीही या आंदोलनात सहभागी झाले होते. पंकजा मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा उमेश पाटील यांनी दिला आहे.
पुढे छायाचित्रांच्या माध्यमातून पाहा, पंकजा मुंडेंच्या विरोधात राज्यभर सुरु असलेली आंदोलने...
बातम्या आणखी आहेत...