आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवारांना आता राष्ट्रपती बनवावे- राहुल बजाजांची अमृतमहोत्सवी सोहळ्यात भावना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत अमृतमहाेत्सवासाठी अालेल्या एका अपंग महिलेने दिलेल्या शुभेच्छा स्वीकारताना शरद पवार. - Divya Marathi
मुंबईत अमृतमहाेत्सवासाठी अालेल्या एका अपंग महिलेने दिलेल्या शुभेच्छा स्वीकारताना शरद पवार.
मुंबई- देशाची लोकशाही मजबूत कशी होईल याचा सर्वांनीच प्रयत्न करायला हवा. शेवटच्या माणसालाही लोकशाहीच्या उभारणीत एक महत्त्वाचा घटक आहोत, याचा विश्वास वाटायला हवा. त्यासाठी शक्य ते सर्व आपण सारे करूया, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यात व्यक्त केली.
नेहरू सेंटर येथे ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते पवार यांचा सत्कार करण्यात आला. राज्यपाल विद्यासागर राव, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडला. पवार हे कुशल संघटक आहेतच. मात्र खरे तर ते राजगुरू आहेत, अशा शब्दांत राव यांनी पवारांचा गौरव केला. पवारांनी राष्ट्रपती व्हावे, अशा शुभेच्छा उद्योगपती राहुल बजाज यांनी दिल्या. पवारांमध्ये दैवी शक्ती असल्याची भावना राज ठाकरेंनी व्यक्त केली. ‘एक व्यक्ती एवढ्या विषयांचा अभ्यास करते, हाच चमत्कार आहे,' अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी पवारांचा गौरव केला.
पुढील स्‍लाइट पाहा, पवारांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शेअर केलेले फोटोज...