आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांचे घूमजावः म्हणाले, सवर्णांकडूनच होतो अॅट्रॉसिटीचा गैरवापर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दलितांनी कधीही अॅट्रॉसिटीचा गैरवापर केलेला नाही. उलट दोन सवर्णांच्या भांडणात दलित तरुणांचा वापर करून कायद्याचा गैरवापर केला जात आहे. हा गैरवापर होऊ नये एवढेच आपणाला म्हणायचे होते. अॅट्रॉसिटी रद्द करावा, असे मी कधीही बोललो नाही. माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला गेला, असे घूमजाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी केले.

कायद्याचा गैरवापर होत असेल तर सरकारने त्यात लक्ष घालून गैरसमज दूर केले पाहिजेत असेही पवारांनी राष्ट्रवादी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. अॅट्रॉसिटीबाबत पवारांनी औरंगाबादेत केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.आपल्या वक्तव्यावर जोरदार टीका होत आहे, हे लक्षात येताच त्यांनी भूमिका बदलली. सध्या राज्यात मराठा आणि ओबीसी समाजाचे मोठे मोर्चे निघत आहेत. जेव्हा एखादा वर्ग एवढ्यामोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरतो तेव्हा त्या मागचे सत्य सरकारने जाणून घेतले पाहिजे. दलित, उपेक्षित आणि अन्य समाजात कधीही अंतर वाढता कामा नये ही आपली भूमिका आहे. उस्मानाबाद आणि कोपर्डीला ज्या घटना घडल्या त्या दुर्दैवी होत्या. त्यामुळे गुन्हेगाराला जात धर्म नसतो. अशा वेळी एका विशिष्ठ समाजाला दोषी धरणे चुकीचे आहे अशीच त्यावेळी आपण भूमिका घेतली होती असे पवारांनी स्पष्ट केले.
इसीसच्या नावावर मुस्लिम तरूणांची धरपकड चुकीची :
इसीसच्यानावावर मुस्लिम तरूणांची धरपकड केली जात आहे, ते साफ चुकीचे आहे. एटीएसने त्यांना बेकायदेशीर ताब्यात घेणे थांबवले पाहिजे. मुस्लिम तरूणांना अटक केल्यास २४ तासांत कोर्टात हजर करा, दोषींना शिक्षा द्या. पण, निरपराधांना तुरूंगात खितपत टाकू नका. यामुळे या समाजात एक वेगळा संदेश जातो. इसिसला मुस्लिम संघटनांनी विरोध केला आहे हे लक्षात घ्या, अशी भूमिकाही पवारांनी घेतली.
आेबीसींना धक्का लावता मराठ्यांना आरक्षण द्या : आेबीसींच्याआरक्षणाला धक्का लावता मराठ्यांना आरक्षण दिले पाहिजे. आर्थिकदृष्ट्या मागास मराठा समाज मोठ्या संख्येने आहे. हा समाज आरक्षणासाठी आता रस्त्यावर उतरत असून त्याच्याकडे फारकाळ दुर्लक्ष करता येणार नाही, असे सांगत पवारांनी मुस्लिमांच्या आरक्षणाचीही मागणी केली.

अंतर्गत सुरक्षेच्या नावाखाली आणीबाणी
पवारम्हणाले, अंतर्गत सुरक्षेच्या नावाखाली फडणवीस राज्यात आणीबाणी आणू पाहत आहेत की काय? कोणताही कायदा करताना त्याची चर्चा आधी मंत्रिमंडळात व्हावी नंतर त्याचा मसुदा तयार करायला लावला पाहिजे. पण, फडणवीसांनी वेगळी प्रथा सुरू केली. सचिवच मंत्र्यांना मार्गदर्शन करत आहेत.
पुढे स्‍लाइड्सव्‍दारे जाणून घ्‍या, मराठा आरक्षण आणि आयसिसबाबत काय म्‍हणाले शरद पवार..
बातम्या आणखी आहेत...