आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांची साथ सोडल्यामुळे झेड सुरक्षा काढण्‍यात आली, रामदास आठवलेंचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांची झेड दर्जाची सुरक्षा काढून त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय मुख्य सचिवांच्या अध्यक्षेखालील समितीने बुधवारी घेतला. ‘शरद पवारांची साथ सोडल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला,’ अशी नाराजीची भावना आठवले यांनी व्यक्त केली.


समितीने गेल्या आठवड्यात गणेश नाईक, जयंत पाटील, सुनील तटकरे, अशोक चव्हाण, नसीम खान यांच्या सुरक्षेत कपात करण्याबरोबरच विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते यांची सुरक्षा काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आठवले यांची सुरक्षा झेडवरून ‘वाय’ करण्यात आली. राजकीय बदला घेण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप रिपाइंतर्फे केला जात आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनाही सरकारने सुरक्षा न दिल्यानेच त्यांची हत्या झाली. सुरक्षा कमी केल्यानंतर आठवले यांचे काही बरेवाईट झाले तर त्याची जबाबदारी राज्य सरकारवरच असेल, असेही रिपाइंकडून सांगण्यात आले.दरम्यान, याप्रकरणी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन आपले म्हणणे मांडणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.

राज ठाकरेंना झेड सुरक्षा
मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने मनसेप्रमुख राज ठाकरे यांना झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था देऊ केली आहे. यापूर्वी त्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. राज ठाकरे यांनी याआधी आपली सुरक्षा व्यवस्था स्वत:हून सरकारला परत केली होती.