आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar Sends Clarification To Poll Panel Notice On 'ink' Remarks

निवडणूक आयोगाकडे शरद पवारांची दिलगिरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बोटावरची शाई पुसा आणि दोनदा मतदान करा, असे विधान करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणी अखेर निवडणूक आयोगाकडे खेद व्यक्त केला असून हा विषय संपवण्याची विनंती केली आहे. आपण हे विधान गमतीने केले होते, पण तरीही याबाबत आक्षेप असल्यास आपण दिलगिरी व्यक्त करतो. नवी मुंबईतील ती प्रचारसभा नव्हती, तर माथाडी कामगारांचा मेळावा होता आणि आपल्या बोलण्याचा विपर्यास केला गेला, असे स्पष्टीकरण पवारांनी दिले आहे. आपल्या विधानामुळे खळबळ उडाल्याने पवारांनी कधी नव्हे इतक्या तातडीने पत्रकार परिषद घेतली होती. आपण हे विधान गमतीने केले होते, असे ते म्हणाले होते.