आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar Latest News In Marathi Sharad Pawar Shocked After 5 State Assembly Election Exit Poll.

एक्झिट पोलचा शरद पवारांनी घेतला धसका, मंत्र्यांना दिले कामाला लागण्याचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणा-या उत्तरेकडील पाच राज्यातील विधानसभेच्या मतदानानंतर विविध वाहिन्यांनी दाखविलेले एक्झिट पोल पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार चिंतित झाले आहेत. पाच राज्यांपैकी महत्त्वाच्या चार राज्यात सर्वांनी भाजप सत्तेत येईल, असे पोल दाखविल्याने वा-याची दिशा बदलत चालल्याचे पवारांचे मत बनले आहे. त्यामुळेच काल रात्री मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची कन्या अंकिताच्या स्वागत समारंभाला एकत्र आलेल्या पक्षाच्या सर्व मंत्र्यांना पवारांनी तातडीने अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर बोलवून घेतले. तसेच बदलत्या परिस्थितीची माहिती दिली. तसेच आपले अस्तित्त्व टिकवायचे असेल तर लागलीच कामाला लागा असे सल्लावजा आदेश दिला.
बंगल्यावर सर्व मंत्री हजर झाल्यानंतर पवारांनी नेत्यांना व मंत्र्यांना काही अडचणी आहेत का असा सवाल केला. त्यानंतर त्यांनी मंत्र्यांना मार्गदर्शन केले. पाच राज्यापैकी महत्त्वाच्या चारही राज्यात भाजप सत्तेवर येईल असे सर्व निकालपूर्व सर्वेक्षण चाचण्यात सांगितले गेले आहे. हे निकाल काँग्रेसच्या विरोधात गेल्यानंतर आपल्या पक्षालाही अडचणीचे ठरणार आहेत. यूपीएविषयी जनतेत मोठी नाराजी आहे. आपणही यूपीएचा एक घटकपक्ष असल्याने याचा फटका आपल्यालाही बसू शकतो, त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी व मंत्र्यांनी तातडीने कामाला लागले पाहिजे, असे पवारांनी उपस्थित मंत्र्यांना सांगितले.
पवारांनी मंत्र्यांना आणखी काय कानमंत्र दिला, वाचा पुढे...