आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - वारंवार होणारे बॉम्बस्फोट थांबवण्यात गुप्तचर यंत्रणा, अधिका-यांना आलेल्या अपयशाबद्दल केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी शनिवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. अशा अधिका-यांवर मंत्र्यांनी कडक कारवाई केली पाहिजे, असे त्यांनी गृहमंत्री आर.आर. पाटील यांना सुनावले. 26/11 हल्ल्याला 4 वर्षे होऊनही सीसीटीव्हीची निविदाही न काढल्याबद्दल गृहमंत्र्यांना पवार यांनी फटकारले.
मुंबई, पुण्यामध्येच वारंवार स्फोट का होतात, असे पंतप्रधानांनी विचारले तेव्हा आपल्याकडे याचे उत्तर नव्हते. संबंधित अधिकारी हे थांबवण्यात अपयशी ठरत असतील तर त्यांना त्यांची जागा दाखवा असे आदेशही त्यांनी दिले. केंद्रीय गृहमंत्री म्हणून आपण 10-12 वर्षे काम केले आहे. गुप्तचर विभाग आणि कायदा व सुव्यवस्था त्यांना योग्य प्रकारे हाताळता येत नसतील तर संबंधित मंत्र्यांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे पवार यांनी सुनावले.
समन्वय बैठक 7 ऑगस्टला - काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर पवारांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर यूपीएचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये संवाद वाढवण्यासाठी 7 ऑगस्टला समन्वय समितीची बैठक होत आहे.
औरंगाबादला दुष्काळाची स्थिती गंभीर - यंदाचा दुष्काळ 1972 पेक्षा भयंकर आहे. नाशिक, औरंगाबाद, जालना परभणी जिल्ह्यांत परिस्थिती गंभीर असल्याचे पवार यांनी मुंबईत राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांच्या कार्यक्रमात सांगितले. जायकवाडी व उजनी धरणांमध्ये पाणीसाठा घटला आहे, तर नाशिकला पाणीपुरवठा करणा-या धरणांमध्ये तीन ते चार महिने पुरेल एवढेच पाणी आहे. या पार्श्वभूमीवर राज्याला सर्वतोपरी मदतीची ग्वाही पवारांनी दिली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.