आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar Sonia Gandhi Meeting Held At New Delhi

शरद पवार-सोनियांत पाऊण तास चर्चा, जागावाटपावर आठवडाभरात वाटाघाटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी करण्याचा निर्णय बुधवारी झाला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. 45 मिनिटे झालेल्या बैठकीत जागावाटपावर निर्णय झालेला नाही, असे पवार यांनी नंतर स्पष्ट केले. आठवडाभरात यावर वाटाघाटी होतील. 288पैकी राष्ट्रवादीची 144 जागांची मागणी आहे.

राष्ट्रवादीला 11 वाढीव जागा
राष्ट्रवादीची 144 जागांची मागणी असल्याचे पवार म्हणाले, त्यावर गेल्या वेळी काँग्रेसने गमावलेल्या 11 जागा वाढवून मिळू शकतील, असे सोनियांनी सांगितल्याचे वृत्त आहे.
मनसेशी छुपी युती शक्य
लोकसभेच्या वेळी महायुतीने 244 जागी आघाडी घेतली. आता एकत्र न आल्यास 75 जागाही मिळणार नाहीत, म्हणून आघाडी अपरिहार्य होती. मनसेशी छुपी युती करण्याचे घाटत आहे.

नेत्यांनो, पोषक बोला
दोन्ही काँग्रेसचे नेते एकमेकांवर तोंडसुख घेऊन मतभेद चव्हाट्यावर आणत आहेत. त्याचा फटका बसू शकतो हे पाहून आघाडीला पोषक बोलण्याच्या नेत्यांना सूचना आहेत.

सोनिया, पवारच अंतिम : जागावाटपावर समन्वय समिती नावालाच ठरेल. अंतिम निर्णय सोनिया-पवारच घेतील.