मुंबई- भारताचे तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर यशवंतराव चव्हाण यांना पंतप्रधान बनण्याची संधी चालून आली होती. काँग्रेसच्या नेत्यांनी चव्हाणांच्या नेतृत्त्वावर शिक्कामोर्तब केले होते. मात्र त्यावेळी चव्हाण यांचा 'सुसंस्कृतपणा' आडवा आला अन् हातातोंडाला आलेला घास इंदिराजींनी खेचून घेतला, अशी आठवण सांगितले आहे यशवंतरावांचे शिष्य आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी.
देशाचे गृहमंत्रिपद भूषविलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनकार्याचे दर्शन घडविणा-या चित्रपटाची माहिती देताना पवार बोलत होते. या चित्रपटाच्या शुटिंगचा शेवटचा सीन दिल्लीत नुकताच दिल्लीत चित्रित करण्यात आला. त्यावेळी शरद पवारही उपस्थित होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन जब्बार पटेल करीत आहेत. याबाबतची माहिती देताना शरद पवारांनी यशवंतरावांबरोबरच्या जुन्या आठवणी जागवल्या.
पवार म्हणाले, लालबहाद्दूर शास्त्री यांच्या निधनानंतर चव्हाण यांना संधी चालून आली होती. काँग्रेस नेत्यांनी चव्हाण हे वरिष्ठ नेते असल्याने त्यांचेच नाव पुढे केले होते. कारण चव्हाण यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासमवेतही काम केले होते. त्यामुळे चव्हाण यांच्याबद्दल तत्कालीन काँग्रेसजनांत कमालीचा आदर होता. मात्र, इंदिरा गांधींची भेट घेऊनच आपण पुढे जायचे असे चव्हाणांनी ठरविले. मी त्यांना सांगितले की, आधी पद स्वीकारा व नंतर इंदिराजींची भेट घ्या. पण चव्हाण यांनी ते टाळले.
पंडित नेहरूंचे माझ्यावर खूप उपकार आहेत. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीत त्यांनी माझे म्हणणे ऐकले होते तसेच इंदिराजींचीही मदत झाली होती. अशा वेळी त्यांची भेट घेऊन पुढे जावू, अशी सुसंस्कृत भूमिका त्यांनी घेतली. इंदिराजींना चव्हाण भेटले मात्र त्यावेळी इंदिराजींच्या कंपूत काहीतरी वेगळेच शिजत होते. चव्हाण यांनी इंदिराजींची भेट घेतली आणि तिथेच माशी शिंकली. भेटून आल्यानंतर काही वेळातच आपण स्वत: पंतप्रधान स्वीकारत असल्याचे इंदिराजींनी सांगितले. जर चव्हाण पद स्वीकारून इंदिराजींच्या भेटीला गेले असते तर ते पंतप्रधान बनले असते. मात्र त्यावेळी चव्हाण यांच्या आड सुसंस्कृतपणा आला अन् पदाने हुलकावणी दिली, अशी आठवण पवारांनी 1966-67 या काळातील सांगितली.
पुढे वाचा, यशवंतरावांच्या आयुष्यावर येऊ घातलेल्या चित्रपटाविषयी...