आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar To Visit Drought Affected Areas In Marathwada

आधी \'या\' प्रश्‍नांचे उत्‍तरे द्या मग मोर्चे काढा, मुख्यमंत्र्याचे शरद पवार यांना प्रत्‍युत्‍तर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - उस्‍मानाबादमध्‍ये शेतक-यांचा मोर्चा काढून मोदी सरकारवर टीकास्‍त्र सोडणा-या राष्‍ट्रवादी काँग्रेसचा मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी चांगलाच समाचार घेतला. उस्‍मानाबादची जिल्‍हा बँक कोणी खाल्‍ली ? उस्‍मानाबादच्‍या सूत गिरण्‍या कोणामुळे बंद पडल्‍या ? उस्मानाबादचे हक्काचे पाणी कोणी पळवले ? या प्रश्‍नांची उत्तरे राष्ट्रवादी काँग्रेसने द्यावीत, नंतरच सरकारविरोधात मोर्चे काढावेत, असा प्रतिहल्ला मुख्‍यमंत्र्यांनी केला.

शेतक-यांच्‍या मागण्‍या पूर्ण करा अन्‍यथा 14 सप्‍टेंबरपासून मोठ्या प्रमाणात जेलभरो आंदोलन करू असा इशारा शरद पवार यांनी उस्‍मानाबादेत दिला. मोदी सरकार चाकोरीत काम करत नाही, शेतक-यांच्‍या प्रश्‍नांची या सरकारला जाणीव नाही, ज्‍यांच्‍या हाती सत्‍ता आहे त्‍यांना गरीबांची पर्वा नाही अशा टीका पवार यांनी केल्‍या. त्‍याला प्रत्‍युत्‍तर देताना फडणवीसांनी राष्‍ट्रवादीवर नेम साधला. राष्‍ट्रवादीमुळेच आज मराठवाड्यातील शेतक-यांची बिकट अवस्‍था असल्‍याचे त्‍यांनी अप्रत्‍यक्ष सांगितले. संसदेच्या अधिवेशनात गोंधळ घालून कामकाज होऊ न दिल्याबद्दल त्यांनी काँग्रेसवरही टीका केली.