आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar Tried To Solve Conflicts Between Sunil Tatkare bhaskar Jadhav

तटकरे-जाधवांचे पवारकाकांनी कान टोचले, मिळून काम करण्याच्या आणाभाका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कोकणातील दोन दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव व मंत्री सुनील तटकरे यांच्यातील वाद मिटविण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवारांनी वरिष्ठ नेत्यांसह बैठक घेऊन झाडाझडती घेतली. तसेच भविष्यात सामोपचाराने घेत एकमेंकात गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या, असे सांगत दोघांचे कान उपाटले. ही बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दैवगिरी बंगल्यावर पार पडली. यावेळी पक्षाचे जेष्ठ नेते अजित पवार, कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, आर. आर. पाटील, कोकणातील मंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम, रायगडचे जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल उपस्थित होते.
तटकरे-जाधव यांच्यातील वाद मुद्यावरून गुद्यावर पोहचला आहे. त्यामुळे कोकणातील पक्षातील पदाधिका-यांची व कार्यकर्त्यांची गोची झाली होती. त्यामुळे अनेकांनी पक्षाध्यक्ष शरद पवारांकडे तक्रार केली होती. या प्रकरणात लक्ष घाला व दोघांतील वाद मिटवा अन्यथा आम्हाला काम करणे शक्य नसल्याचे पवारांना कार्यकर्त्यांनी सांगितले होते. त्यामुळे पवारांनी आज बैठक बोलावली होती. शिवसेनेतील वाद ताजा असतानाच त्यातून काहीतरी बोध घ्या. पक्षात वर्चस्वाच्या लढाईतून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असून, ते आपल्या पक्ष संघटनेला शोभत नाही असे सांगत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कानउघाडणी केली. यावर भास्कर जाधवांनी आपल्याकडून चूक झाल्याचे कबूल मान्य करीत वादावर पडदा पाडू, असे वचन पक्षाध्यक्षांना दिले.
भास्कर जाधव म्हणाले, माझी काम करण्याची पद्धत व शैली शिवसेनेसारखी आहे. तर तटकरे यांची काँग्रेसी पद्धत आहे. त्यामुळे माझ्याकडून काही वेळा संयम सुटला. मात्र, यापुढे असे होणार नाही. पक्ष असो आपले घर वाद होत असतात. सार्वजनिक जीवनात काम करताना काही वेळा वाद होतात. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते. त्यामुळे समज-गैरसमज होत असतात. पण यापुढे एकत्र काम करू व पक्षाला कोकणात मोठे यश मिळवून देण्याबाबत एकत्रित काम करू, असे जाधव यांनी सांगितले. तटकरे यांनीही यापुढे एकत्र काम करू असे सांगितले.
पुढे वाचा, सुनील तटकरेंचा वाढता प्रभाव रोखण्यासाठीच संघटनेच्या माध्यमातून पवारांनी जाधवांच्या गळ्यात माळ घातली..