आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करू- शरद पवारांची शेतक-यांना ग्वाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेताच्या बांधावर जाऊन दुष्काळामुळे जळालेल्या मोसंबीच्या बागांची पाहणी करताना शरद पवार... - Divya Marathi
शेताच्या बांधावर जाऊन दुष्काळामुळे जळालेल्या मोसंबीच्या बागांची पाहणी करताना शरद पवार...
औरंगाबाद- यंदाचा दुष्काळ हा आतापर्यंतचा सर्वाधिक होरपळवणारा आहे. या दुष्काळाला तोंडे देणे आवाक्याबाहेरचे असून शेतकऱ्यांसाठी जणू आभाळ फाटले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने कर्जमाफी द्यावी. खरिपाच्या पेरणीसाठी तसेच व्याजातही सवलत द्यावी अन्यथा प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करू, अशी ग्वाही माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिली.
शरद पवार यांच्या तीन दिवसांच्या मराठवाडा दुष्काळ पाहाणी दौऱ्याची सुरुवात आज औरंगाबाद जिल्ह्यातून झाली. चित्तेपिंपळगाव येथे भेट देऊन शरद पवार यांनी यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच शेताच्या बांधावर जाऊन दुष्काळामुळे जळालेल्या मोसंबीच्या बागांची पाहाणी केली. पवार म्हणाले, शेतक-यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुढाकार घेऊन त्यांच्या मदतीसाठी उभी राहील. यापूर्वीच्या केंद्र आणि राज्य सरकारने वेळोवेळी शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. मात्र आत्ताचे सरकार मदत करताना दिसत नाही. सध्याचे सरकार हे उद्योग आणि शहरी भागाकडे जास्त लक्ष देणारे आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मालाला किंमत नाही मिळाली तरी चालेल, पण शहरातल्या लोकांसाठी भाववाढ करू द्यायची नाही हे या सरकारचे धोरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जर त्यांच्या मालाला योग्य किंमत व सरकारी मदत पदरात पाडून घ्यायची असेल तर त्यासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज आहे. शेतक-यांच्या मालाला योग्य भाव मिळाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून सरकारविरोधात संघर्ष करू व शेतक-यांना न्याय देऊ अशी ग्वाही पवारांनी यावेळी उपस्थित शेतक-यांना दिली.
बातम्या आणखी आहेत...