आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा क्रांती मोर्चाबाबत काय म्हणाले शरद पवार, ट्विटरवर व्यक्त केली ही मते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मराठा समाजाने मुंबईत काढलेल्या मराठा क्रांती मूकमोर्चावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या सर्वसमावेशक प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नव्या पिढीच्या आकांक्षांच्या पूर्ततेसाठी योग्य पाउले टाकली जातील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 
 
तत्पूर्वी त्यांनी आज मुंबईमध्ये मराठा मोर्चा हा अत्यंत शांततेने होत आहे आणि आपली भूमिका मोर्चेकरी शासनाकडे मांडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राजर्षि शाहू महाराजांची मराठा समाजहिताची संकल्पना व अन्य अठरापगड जाती-जमातीच्या प्रश्नालाही सकल मराठा विचारांची साथ राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मोर्चेकऱ्यांच्या या सर्व प्रयत्नांना माझ्या मनापासून शुभेच्छा देतानाच मोर्चेकऱ्यांचा परतीचा प्रवास सुखरूप व्हावा, ही सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. 
 
पुढील स्लाईडवर पाहा शरद पवारांचे ट्विट्स
बातम्या आणखी आहेत...