आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांसाठी राज- उद्धव एकत्र येणार, मुंबईत आज कार्यक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना एका व्यासपीठावर आणणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आता उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंना एका मंचावर आणणार आहेत. शनिवारी पवारांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित सोहळ्यात ठाकरे बंधूंसह महसूल मंत्री एकनाथ खडसे, प्रसिद्ध गीतकार-दिग्दर्शक गुलजार, अभिनेता नाना पाटेकरही उपस्थित राहणार आहेत.

शरद पवारांच्या अमृत महोत्सवानिमित्त शनिवारी संध्याकाळी येथील नेहरू सेंटर येथे त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना, लेखक मधू मंगेश कर्णिक, उद्योगपती राहूल बजाज, संगणक तज्ञ्ज विजय भटकर यांची उपस्थितीही राहणार आहे. याप्रसंगी पवारांच्या बद्दल विविध क्षेत्रातील नामवंतांनी व्यक्त केलेल्या भावनांचे आधारवड हे पुस्तक एकाच वेळेस पाच भाषेत प्रकाशित केले जाणार आहे.