मुंबई- मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यातील विविध शहरांमध्ये लाखो मराठा बांधवांचे मूक मोर्चे निघत आहेत. दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रीया आज समोर आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्यावा, असे मत शरद पवार यांनी मांडले. पण, हा निर्णय घेताना इतर कोणत्याही घटकांंना धक्का लावू नये, असेही पवार यांनी म्हटले आहे. रायगड जिल्ह्यातील उरण येथे ते पत्रकारांशी बोलत होते.
आणखी काय म्हणाले पवार..
लाखोंच्या संख्येने निघणारे मराठा समाजाचे मोर्चे हे कोणत्याही समाजाविरोधात नाहीत. या मोर्चांमध्ये मोठ्या प्रमाणात तरुण रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्यायला हवा असे, शरद पवार म्हणाले. याशिवाय पठाणकोट आणि उरी हल्ल्याबद्दलचा निर्णय लष्कर प्रमुखांचा सल्ला घेऊन घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पुढे वाचा, काही दिवसांपूर्वी सह्याद्री वाहिनीच्या मुलाखतीत काय म्हणाले मुख्यमंत्री..
मराठा आरक्षणाबाबत पवार यांनी काय दिली होती प्रतिक्रीया..