आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णांवर पवार ठोकणार मानहानीचा दावा, कारखाने विक्रीचा अाराेप, याचिकेवर उद्या सुनावणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर/ ठाणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व अजित पवार यांनी सहकारी कारखाने कवडीमोल भावाने विकून सरकारी तिजोरीचे २५ हजार कोटीचे नुकसान केल्याचा आरोप करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर आपण मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. यामुळे हजारे िवरुद्ध पवार वाद िचघळण्याची शक्यता आहे. 

राजकीय नेत्यांनी सहकारी साखर कारखाने कवडीमोल भावाने विकल्याचा आरोप करत हजारे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. याचिकेत शरद पवार, अजित पवार यांच्यासह बड्या नेत्यांना प्रतिवादी केले आहे. या याचिकेवर ६ जानेवारी रोजी सुनावणीची शक्यता आहे.

पत्रकारांशी बोलताना हजारेंचा नेहमीच्या सौम्य शैलीत समाचार घेत पवार म्हणाले, हजारे हे जनसेवक आहेत, जाऊ द्या असे याआधी म्हणत होतो. पण, आता त्यांनी आम्हाला संधी िदली आहे. थेट न्यायालयाच्या दारी जाऊन आमच्यावर आरोप केल्याने आम्हीही मागे हटणार नाही. त्यांच्यावर फौजदारी व िदवाणी असे दोन्ही प्रकारचे दावे ठोकण्यात येतील, असे पवार म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...