आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षा चालकांचा 19 फेब्रुवारीला संप : राव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 19 फेब्रुवारी रोजी रिक्षा चालक आणि फेरीवाले संप पुकारणार असल्याचे कामगार नेते शरद राव यांनी शनिवारी सांगितले. रिक्षा चालकांच्या सोयीसाठी पाटणकर समिती आणि हकीम समितीने केलेल्या शिफारशींवर अमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी मुंबई ऑटोरिक्षा युनियनकडून करण्यात आली आहे.मुंबईत सध्या फेरीवाल्यांविरोधात होणारी कारवाई योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांना लक्ष केले होते. मनसेला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच पोसले असल्याचा आरोपही राव यांनी यावेळी केला. यावेळी युनियचे पदाधिकरी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.