आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी केले मतदान, पण वॉर्डात NCP चा उमेदवारच नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मतदान कोणत्या पक्षाला करणार? असा प्रश्न उभा राहिला आहे. कारण मुंबईतल्या ज्या वॉर्ड क्रमांक 214 मध्ये पवार आणि त्यांची नात रेवती (सुप्रिया सुळेंची मुलगी) यांचे मतदान आहे, त्या वॉर्डात राष्ट्रवादीचा उमेदवारच नाही.

- मीडिया रिपोर्टनुसार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे मुंबईतील वॉर्ड क्रमांक 214 मधील मतदार आहेत. त्यांच्यासोबत त्यांची नात रेवती आणि जावई सदानंद सुळे यांचेही नाव आहे. 
- पवार कुटुंबींयानी सकाळीच मतदान केले. रेवतीचे हे पहिले मतदान असल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 
- पवारांनी ज्या वॉर्डसाठी मतदान केले तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवारच नव्हता. त्यामुळे त्यांनी कोणाला मतदान केले असेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 
- या वॉर्डमध्ये शिवसेनेकडून अरविंद बने, भाजपकडून अजय पाटील, काँग्रेसचे कौशिक शहा आणि मनसेचे धनराज नाईक रिंगणात आहेत.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...