आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shard Joshi Supporter Embarassed Broom, Chatap, Gunwant Patil Get AAP Candiature

शरद जोशींच्या शिलेदारांच्या हाती आता आपचा ‘झाडू’; चटप, पाटील यांना ‘आप’ची उमेदवारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवत शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या वामनराव चटप आणि गुणवंतराव पाटील या दोन नेत्यांनीही आम आदमी पार्टीच्या तिकटीवर लोकसभा लढवण्याचा निर्णय जाहीर केला.वामनराव चटप तीन वेळा विधानसभेचे सदस्य राहिलेले असून शेतकरी संघटनेचे विदर्भातील मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात. आगामी लोकसभेसाठी चटप यांना चंद्रपूरमधून ‘आप’च्या वतीने तिकीट दिले जाणार आहे. शेतकरी संघटनेचे दुसरे नेते गुणवंत पाटील नांदेडमधून निवडणूक लढवणार आहेत. मागच्या आठवड्यात रघुनाथ पाटील यांनी ‘आप’ला पाठिंबा दश्रवला होता. तसेच ते सांगलीमधून लढण्यास इच्छुक आहेत.


राजू शेट्टी महायुतीबरोबर गेले. त्यामुळे इतर शेतकरी संघटना ‘आप’कडे आल्या आहेत. शेतमालाच्या किमती कमी राहण्यासाठी ‘आप’ची लढाई आहे, तर शेतमालाच्या किमती चढ्या राहाव्यात यासाठी शेतकरी संघटना आग्रही आहेत. परस्परविरोधी भूमिका असणारे ‘आप’ आणि शेतकरी संघटना दोन लोकसभा मतदारसंघांत आघाडी करत असल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.


आम्ही दोघे नेते शरद जोशी यांच्या परवानगीने ‘आप’च्या तिकटीवर लढणार आहेत. मात्र, जोशी यांची शेतकरी संघटना ‘आप’मध्ये विलिन झालेली नाही. शेतकरी संघटनेचे स्वतंत्र अस्तित्व कायम आहे, असे चटप यांनी स्पष्ट केले.


काँग्रेसचे सावंत ‘आप’मध्ये
मुंबईतील काँग्रेसचे बंडखोर नेते अजित सावंत यांनी गुरुवारी ‘आप’मध्ये प्रवेश केला. मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून काम केलेल्या सावंत यांना पक्षविरोधी कारवायाबद्दल काँग्रेसने हकालपट्टी केली होती.