आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - प्राध्यापकांचा 54 दिवसांपासून सुरू असलेला संप मिटवण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मध्यस्थी केल्याने तिढा सुटण्याची चिन्हे आहेत. पवार यांनी शनिवारी मुंबईतील निवासस्थानी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा केली. केंद्राकडे असलेल्या 1500 कोटी रुपयांच्या थकबाकीसाठी पाठपुरावाही ते करणार आहेत.
नेट-सेटग्रस्त प्राध्यापकांचा सेवाकाल, सहाव्या वेतन आयोगातील फरक अशा 13 मागण्यांसाठी राज्यातील सात विद्यापीठांतील प्राध्यापकांनी संप पुकारला आहे. पेपर तपासणीवरच प्राध्यापकांनी बहिष्कार टाकल्याने निकाल लांबण्याची शक्यता आहे. शिवाय परीक्षांवरही परिणाम होत आहे. प्राध्यापकांची संघटना ‘एमफुक्टो’ आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्यात तीन बैठका झाल्या, परंतु तोडगा निघाला नाही. प्राध्यापकांना सहाव्या वेतन आयोगानुसार तफावत देण्यासाठी 1500 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. राज्य सरकारने 500 कोटी रुपयांच्या तीन टप्प्यांमध्ये ही रक्कम देण्याचा निर्णय घेतला, परंतु त्याला मनुष्यबळ विकास मंत्रालयाची परवानगी घेतलेली नाही. एमफुक्टोने केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाची प्रथम परवानगी घ्या, अशी मागणी केली आहे.
उच्च व तंत्रशिक्षण खाते राष्ट्रवादीकडे असल्याने पवार यांनी मध्यस्थी करण्याचे ठरवले. त्यांनी टोपेंकडून माहिती घेतली. केंद्राकडे थकबाकीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सोमवारी टोपे पुन्हा प्राध्यापकांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.