आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शरद पवार यांची प्रकृती उत्तम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/ नवी दिल्ली - केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची प्रकृती उत्तम असून, तब्येतीवरून सुरू असलेल्या वृत्तांचा राष्‍ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी गुरुवारी इन्कार केला. दरम्यान, आपली प्रकृती ठणठणीत असून, कर्नाटकातील एका कृषी संस्थेचा आढावा घेतला असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

कोल्हापूर येथील सरपंच परिषदेत पवार यांना थकवा जाणवत होता. त्यामुळे दौरा सोडून ते पुण्यास परतले होते. एक दिवस विश्रांती घेतल्यानंतर पवार सध्या बंगळुरू, म्हैसूर आणि उटीच्या दौ-यावर आहेत. कार्यकर्त्यांनी काळजी करू नये. अफवा पसरवू नयेत, असे पिचड यांनी म्हटले आहे. जाणीवपूर्वक अफवा पसरवणे राज्याला संस्कृतीला शोभणारे नाही, असेही पिचड यांनी म्हटले आहे.