आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेतील आकडेवारीने गुंतवणूकदार धास्‍तावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अमेरिका फेडरल रिझर्व्हकडून रोखे खरेदीत आणखी कपात. चीनमधील डळमळीत आर्थिक आकडेवारी यामुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी गुरुवारी विक्रीचा धडाका लावल्याने बाजार घसरला.विक्रीच्या मार्‍याने पाच सत्रांच्या तेजीला वेसण बसली. सेन्सेक्स 186.33 अंकांनी घसरुन 20,536.64 वर बंद झाला. निफ्टीने 61.30 अंक गमावत 6091.45 ही पातळी गाठली.
एचएसबीसी मार्किट सर्व्हेत चीन मधील उत्पादनाची आकडेवारी घसरल्याचे दर्शवण्यात आल्याने आशियातील शेअर बाजारात घसरण दिसून आली. अमेरिकेतील गृहबांधणीत जानेवारीत अपेक्षेपेक्षा कमी वाढ दिसून आली. त्यामुळे फेडरल रिझर्व्ह रोखे खरेदीत आणखी कपात करणार का या शंकेने गुंतवणूकदारांना घेरले. त्यातून झालेल्या विक्रीमुळे शेअर बाजार गडगडले. आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, एसबीआय, टाटा स्टील आदी समभागांना विक्रीचा फटका बसला. बाजारातील बँकिंग,धातू, एफएमसीजी, तेल आणि वायू, तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान आदी क्षेत्रीय निर्देशांक घसरले. दरम्यान, विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी बुधवारी बाजारातून 468.47 कोटी रुपयांची समभाग खरेदी केल्याचे सेबीच्या आकडेवारीत म्हटले आहे. बाजारातील 1480 समभाग घसरले तर 1192 समभाग चमकले आणि 148 समभाग स्थिर राहिले.
रुपया घसरबन 62.23 वर
आयातदारांकडून अमेरिकी चलनाला आलेली मागणी आणि शेअर बाजारातील घसरण याचा फटका गुरुवारी रुपयाच्या मूल्याला बसला. डॉलरच्या तुलनेत रुपया तीन पैशांनी घसरून 62.23 वर स्थिरावला. अल्पारी फायनान्शियल सर्व्हिसेसचे सीईओ प्रमित ब्रह्मभट्ट यांनी सांगितले की, चीनमधील उत्पादनातील घट आणि फेडरल रिझर्व्हचे कपातीचे संकेत याचा फटका रुपयाच्या मूल्याला बसला.
सोने चकाकले, चांदी घसरली
दोन दिवसांच्या घसरणीला ब्रेक लावत पिवळ्या धातूने गुरुवारी तेजीची चकाकी नोंदवली. राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोने तोळ्यामागे 25 रुपयांनी वाढून 31,250 झाले. औद्योगिक क्षेत्राकडून मागणी घटल्याने चांदी किलोमागे 320 रुपयांनी घसरून 47,500 झाली. सराफा व्यापार्‍यांनी सांगितले, लग्नसराईमुळे सोन्याला आलेली मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक कल यामुळे सोने चकाकले. लंडनमधील सराफ्यात सोने औंसमागे 0.1 टक्क्यांनी वाढून 1313.42 डॉलर झाले.
घसरणीची कारणे
एचएसबीसी मार्केट सर्व्हेनुसार चीनमधील उत्पादनाच्या आकडेवारीत घसरण
अमेरिकेतील गृहनिर्माण आकडेवारीत अपेक्षेपेक्षा कमी वाढ
अमेरिका फेडरल रिझर्व्ह रोखे खरेदी कपात करण्याची शक्यता
ड्रॅगन इफेक्ट
चीनमधील उत्पादन कमी झाल्याने जगभरातील शेअर बाजारात घसरण दिसून आली. त्यातच अमेरिका फेडरल रिझर्व्हने रोखे खेरदीत कपातीचे संकेत दिल्याने दबाब आणखी वाढला. त्यातून झालेल्या विक्रीमुळे बाजारात घसरण दिसून आली.
राकेश गोयल, उपाध्यक्ष, बोनान्झा
आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, एसबीआय, टाटा स्टील, एचडीएफसी, हिंदाल्को इंडस्ट्रीज, आयटीसी, कोल इंडिया, गेल इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा, इन्फोसिस