आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन खानांमधील वाद पुराण; सलमानने म्हटले शाहरुखला ओव्हर अ‍ॅक्टर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - काही वर्षांपासून बॉलीवूडमध्ये थांबलेला सलमान आणि शाहरुख खानमधील वाद पुन्हा नव्याने रंगणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. एका जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यान सल्लूने दबंगगिरी करत शाहरुख खानला चक्क ओव्हर अ‍ॅक्टर असे संबोधले.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका बंगल्यात सलमान खान आणि आमना शरीफ यांच्यावर एक जाहिरात चित्रित करण्यात आली. या वेळी जाहिरातीच्या एका दृश्यात सल्लूला आमनाकडे चालत जायचे होते. हा सीन उत्तम झाला. मात्र, दिग्दर्शकाला सलमानची स्टेप न आवडल्याने त्याने त्याला पुन्हा रिटेक करण्यास सांगितले. यावर दबंग खानचा पारा चढला आणि त्याने माझ्या जागी मॉडेलला साइन करायचे असते, असे दिग्दर्शकाला सुनावले. प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. दुस-या टेकमध्ये सलमानच्या चेह-या वरील हावभाव दिग्दर्शकाला दाखवायचे होते. मात्र, दोन शॉट देऊनही सीन व्यवस्थित झाला नाही. त्यामुळे पुन्हा सलमानला रिटेक करण्यास सांगण्यात आले. यानंतर मात्र भाईला राग अनावर झाला. त्याने थेट दिग्दर्शकाला सुनावले की, ओव्हर अ‍ॅक्टिंग दाखवायची असती तर माझ्या जागी शाहरुख खानला का घेतले नाही? त्यानंतर उपस्थितांमध्ये पुन्हा एकदा खान बंधूंच्या द्वंद्वाची खुमासदार चर्चा रंगली होती.

विळ्या- भोपळ्याचे सख्य
सलमान आणि शाहरुखमध्ये गेल्या काही वर्षांत फारसे जमत नाही. एका पार्टीत कॅटरिना कैफवरून दोघांत प्रचंड वाद निर्माण झाला होता. यानंतर दोघेही एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. सलमानने बिइंग ह्यूमन नावाची संस्था स्थापन केल्यापासून तो काही प्रमाणात बदलला असल्याचे सांगण्यात येत होते. तसेच चित्रीकरणादरम्यान तो कोणालाही बोलत नाही. एवढेच नाही तर त्याने आता मद्यपानही सोडल्याच्या बातम्या माध्यमांतून प्रसारित झाल्या होत्या.

दोघेही अडचणीत
काही दिवसांपूर्वी शाहरुख खानच्या एका वक्तव्यावरून मोठा गदारोळ झाला होता. यानंतर स्वत: शाहरुखला माध्यमांसमोर येऊन खुलासा करावा लागला होता. तसेच त्याच्या खासगी आयुष्यातही सध्या वादंग निर्माण झाले आहे. दुसरीकडे हिट अँड रन आणि जोधपूरमधील काळवीट प्रकरण सलमान खानच्या मानगुटीवर आहे. त्यामुळे दोघेही सध्या अडचणीत आहेत.