मुंबई - शीना बोरा हत्याकांड प्रकरणात आज महत्त्वाची माहिती मुंबई पोलिसांच्या हाती आली आहे. रायगडच्या जंगलातून मिळालेला मृतदेह शीना बोराचाच असल्याचे तपासात सिद्ध झाले आहे. यासंदर्भातील डीएनए रिपोर्ट आज (सोमवारी) समोर आला आहे. शीना बोराची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह रायगडच्या जंगलात जाळण्यात आला होता.
पोलिसांच्या हाती वैज्ञानिक पुरावा
पोलिसांना राजगडजवळील पेणच्या जंगलात शीनाचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या अवशेषाचे नमुने पोलिसांनी घेतले होते. हा मृतदेह शीनाचाच असावा असा पोलिसांचा अंदाज होता, मात्र त्याला वैज्ञानिक आधार मिळाला आहे. मुंबईतील कलिना येथील फॉरेन्सिक सायन्स लेबॉरेट्रीने डीएनए अहवाल दिला आहे. इंद्राणीचेही नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. त्यावरून हा अहवाल समोर आला आहे.