आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र - शीना बोरा हत्‍येप्रकरणी माझे वडील निर्दोष - राहुल मुखर्जी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शीना बोरा मर्डर मिस्ट्रीत इंद्राणीचे पती आणि स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जी यांना गुरुवारी रात्री सीबीआयने अटक केली. शीना बोरा हत्याकांडातील अटकेत असेलला आरोपी चालक श्याम वीर राय याने दिलेल्या माहितीनंतरच पीटर यांना अटक करण्यात आली आहे. शीना हत्याकांडातील ही चौथी अटक आहे. त्यावर माझे वडील निर्दोष असल्याची प्रतिक्रिया त्याचा मुलगा राहुल मुखर्जीने दिली आहे.
शीना बोरा हत्‍याकांडात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. पीटर मुखर्जीवर खून, खुनाचा कट, अपहरण असे विविध गुन्‍हे दाखल करण्‍यात आले आहेत. पिटर यांना भेटण्‍यासाठी राहुल मुखर्जीने सीबीआयचे कार्यालय गाठले. येथे माझे वडील निर्दोष असल्‍याचा दावा त्‍याने केला आहे. श्याम वीर राय याने खुलासा केला आहे की, पीटर यांना शीनाच्या हत्येबाबत सर्व काही माहित होते. त्याने पीटर आणि इंद्राणीला शीनाच्या हत्येबाबत बोलताना ऐकले आहे. याबाबत सांगितले जात आहे की, पीटर यांचा मुलगा राहुल आणि शीना यांच्यात शारीरिक संबंध होते व हे संबंध लग्नानंतरपर्यंत पोहचले होते. त्यातूनच शीनाची हत्या झाल्याचे आता बोलले जात आहे. दरम्यान, सीबीआयने पीटर मुखर्जी यांच्यावरही हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा, शेतातील एका विहारीत पडला बिबट्या.., हॉस्‍पिटलच्‍या स्वच्छतागृहात मृत अर्भक आढळल्याने खळबळ.., औरंगाबाद महामार्गावर कंटेनरला अपघात.. राज्यातील अनेक भागात पावसाची हजेरी..