आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sheena Bora Murder Case, Here Are Biggest Developments

#Sheenabora मर्डर मिस्ट्री: पीटर मुखर्जी यांच्यावरही हत्येचा गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शीना बोरा मर्डर मिस्ट्रीत इंद्राणीचे पती आणि स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जी यांना गुरुवारी रात्री सीबीआयने अटक केली. शीना बोरा हत्याकांडातील अटकेत असेलला आरोपी चालक श्याम वीर राय याने दिलेल्या माहितीनंतरच पीटर यांना अटक करण्यात आली आहे. शीना हत्याकांडातील ही चौथी अटक आहे. श्याम वीर राय याने खुलासा केला आहे की, पीटर यांना शीनाच्या हत्येबाबत सर्व काही माहित होते. त्याने पीटर आणि इंद्राणीला शीनाच्या हत्येबाबत बोलताना ऐकले आहे. याबाबत सांगितले जात आहे की, पीटर यांचा मुलगा राहुल आणि शीना यांच्यात शारीरिक संबंध होते व हे संबंध लग्नानंतरपर्यंत पोहचले होते. त्यातूनच शीनाची हत्या झाल्याचे आता बोलले जात आहे. दरम्यान, सीबीआयने पीटर मुखर्जी यांच्यावरही हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. इंद्राणी मुखर्जींवर जी कलमे लावली गेली आहेत ती सर्व म्हणजेच 302, 120 B, 306, 201, आणि 363 आदी कलमे पीटर यांच्यावरही लावली गेली आहेत.

मुलगा राहुल व भावाने घेतली भेट-
पीटर मुखर्जी यांचा भाऊ गौतम मुखर्जी आणि मुलगा राहुल मुखर्जी याने मुंबईतील सीबीआयच्या ऑफिसमध्ये जाऊन पीटर यांची भेट घेतली. दरम्यान, शीनाचा सख्खा भाऊ मिखाईल बोराने म्हटले आहे की, मला या केसमध्ये नेमके काय चालले आहे व काय घडणार आहे याची बिलकूल माहिती नाही. सीबीआय चौकशी करीत आहे, बघू या काय होते ते. फक्त माझ्या बहिणीला न्याय मिळावा असेच मला वाटत आहे. मला विश्वास आहे की शीनाला नक्कीच न्याय मिळेल.
पीटर आज कोर्टात, सीबीआयला हवी कोठडी-
पीटर यांना आज दुपारी मुंबई कोर्टात हजर करण्यात येईल. सीबीआयला पीटर यांची कस्टठी हवी व कोर्टात तशी मागणी करणार आहेत. ड्रायव्हरने दिलेल्या माहितीबाबत सीबीआय पीटरकडे चौकशी करू इच्छित आहे. त्यामुळे कोर्ट पीटरला सीबीआयच्या कस्टठीत देईल असे सांगितले जात आहे. काल रात्री पीटर यांना अटक केल्यानंतर त्यांना मुंबईतील सीबीआयच्या ऑफिसमध्ये ठेवले गेले आहे. गुरुवारी रात्री पीटर यांची वैद्यकीय तपासणी केली. शीना मर्डर केसमध्ये आतापर्यंत इंद्राणी मुखर्जी, तिचा माजी पती संजीव खन्ना, कार चालक श्याम वीर राय व पीटर यांना अटक झाली आहे. यातील पीटर वगळता सर्वांना मुख्य आरोपी केले आहे. चार्जशीटमध्ये 150 लोकांच्या प्रतिक्रिया नोंदवल्या गेल्या आहेत. सीबीआयला संशय आहे की, शीनाच्या हत्येबाबत पीटर यांना सर्व काही माहिती आहे मात्र ते माहिती लपवित आहेत.

हजारपानी आरोपपत्र-
विशेष न्यायदंडाधिकारी आर. व्ही. अडोने यांच्या न्यायालयात सादर केलेल्या 1000 पानांच्या आरोपपत्रात 152 जण साक्षीदार असून जणांचा जबाब न्यायदंडाधिकाऱ्यांकडे नोंदवल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाच्या 200 दस्तऐवजांचा समावेशही आरोपपत्रात करण्यात आला आहे. शीना मर्डर हत्याकांडात इंद्राणी मुखर्जी, इंद्राणीचा माजी पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्याम राय या तिघांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. चार्जशीटमध्ये सीबीआयने तिघा आरोपींवर किडनॅप, मर्डर, पुरावे नष्ट करणे आणि फसवणूकीची कलमे लावली आहेत.

हाडांचे अवशेष शिनाचेच-
न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल रायगडच्या गागोदे खिंडीत मिळालेले हाडांचे नमुने हे शिना बोरा हिचेच असल्याचा न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने सीबीआयला दिला आहे. त्यामुळे या खटल्यात एक भक्कम पुरावा तपास यंत्रणांच्या हाती लागला आहे. सीबीआयकडे शीना बोरा हत्याकांड प्रकरणाची केस सप्टेंबर महिन्यात सोपवली होती.