आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ड्रायव्हरचा खुलासा; इंद्राणीने मृतदेह जाळण्यापूर्वी लावले होते लिपस्टिक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- हायप्रोफाइल शीना बोरा मर्डर केसमध्ये सरकारी साक्षीदार झालेला इंद्राणीचा ड्रायव्हर श्यामवर राय याने मोठा खुलासा केला आहे. इंद्राणीनेच शीनाची हत्या केली तसेच तिचा मृतदेह जाळला होता. यात स्वत:ची व संजीव खन्ना (इंद्राणीचा पहिला पती) यांची नेमकी भूमिका काय होती, यासंदर्भातही श्यामवर याने कोर्टात सांगितले.

श्यामवरचा मागील वर्षी 6 नोव्हेंबरला कोर्टात जबाब नोंदवण्यात आला होता. त्यानंतर तो शुक्रवारी पहिल्यांदा समोर आला. त्याने सांगितले की, इंद्राणीने शीनाचा मृतदेह जाळण्यापूर्वी स्वत:च्या ओठांवर लिपस्टिक लावले होते.

श्यामवर राय याने दिलेल्या 12 पानी जबाबात हत्येची पूर्ण कथा सांगितली आहे. सीबीआयला दिलेल्या जबाबात त्याने सांगितले की इंद्राणी मुखर्जीनेच तिच्या मुलीचा गळा आवळला होता. ती शीनाच्या छातीवर बसली होती आणि तिचा श्वास थांबेपर्यंत तिने तिचा गळा आवळला होता. राय हा या गुन्ह्यातील मुख्य आरोपींपैकी एक आहे. त्याला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अटक झाली होती. त्यानंतर इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना आणि पीटर मुखर्जीला अटक करण्यात आली होती.

पुढील स्लाइड्‍सव याचा, 'मॅडमने मला तीन महिन्यांच्या पगारी सुटीवर पाठवले होते'

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...