आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिना बोरा हत्याकांडः पीटर मुखर्जीला अटक, आरोपपत्र दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बहुचर्चित शिना बोरा हत्या प्रकरणाने पुन्हा एकदा नवे वळण घेतले आहे. या हत्येप्रकरणी इंद्राणीचे तिसरे पती आणि स्टार इंडिया कंपनीचे माजी सीईअाे पीटर मुखर्जींना गुुरुवारी सीबीआयने अटक केली. या प्रकरणातील ही चौथी अटक आहे. अटकेत असलेल्या इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना आणि चालक श्यामवर राय या तीन आरोपीं विरोधात सीबीआयने गुरुवारी दुपारी विशेष न्यायदंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले.
शिना बोरा हत्या प्रकरण बाहेर येण्यापूर्वी त्याबाबतची माहिती पीटर यांना होती, असा सीबीआयला संशय असून त्याबाबत गुरुवारी सीबीआयने पीटर मुखर्जींची नव्याने चौकशी केली. त्यानंतर संध्याकाळी उशिरा आठच्या सुमारास सीबीआयने पीटर मुखर्जींना अटक केली. या वेळी पीटर मुखर्जींचा मुलगा आणि शिनाचा प्रियकर राहुलसुद्धा सीबीअाय कार्यालयात हजर होता.
शिना बोरा हिची हत्या इंद्राणी मुखर्जी, तिचा दुसरा पती संजीव खन्ना आणि वाहनचालक श्यामवर राय यांनी एप्रिल २०१२ मध्ये केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. इंद्राणीचा वाहनचालक श्यामवर राय याने पोलिस चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी ऑगस्ट महिन्यात इंद्राणी आणि संजीव खन्ना यांना अटक केली होती.
सुरुवातीला मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी या प्रकरणी वैयक्तिक लक्ष घालून तपास हाती घेतला होता. त्यानंतर त्यांची बदली झाली आणि राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला. मुंबई पोलिसांच्या चौकशीदरम्यानच पोलिस कोठडीचा अवधी संपल्यामुळे सीबीआयने इंद्राणी, खन्ना आणि राय यांची आर्थर रोड कारागृहात चौकशी केली होती.
या तिन्ही आरोपींच्या न्यायालयीन कोठडीचा अवधी शुक्रवारी संपणार होता. त्यामुळे त्यापूर्वीच सीबीआयने हे आरोपपत्र दाखल केले. मागील आठवड्यात श्यामवर राय याने न्यायदंडाधिकाऱ्यांना पत्र लिहिले होते. त्यात त्याने या खटल्याबाबत आपल्याला अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत, असे सांगितले होते. त्यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याचा जबाब न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवला.
पीटर मुखर्जी इंद्राणी
हाडांचे अवशेष शिनाचे
न्यायवैद्यकप्रयोगशाळेचा अहवाल रायगडच्या गागोदे खिंडीत मिळालेले हाडांचे नमुने हे शिना बोरा हिचेच असल्याचा न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने सीबीआयला दिला आहे. त्यामुळे या खटल्यात एक भक्कम पुरावा तपास यंत्रणांच्या हाती लागला आहे.
हजारपानी आरोपपत्र
विशेषन्यायदंडाधिकारी आर. व्ही. अडोने यांच्या न्यायालयात सादर केलेल्या १००० पानांच्या आरोपपत्रात १५२ जण साक्षीदार असून जणांचा जबाब न्यायदंडाधिकाऱ्यांकडे नोंदवल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाच्या २०० दस्तऐवजांचा समावेशही आरोपपत्रात करण्यात आला आहे.