आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बड्या उद्योगपतीच्या दबावामुळे उचलबांगडी, राजीनामा देणार नाही -मारिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावरून राकेश मारिया यांची उचलबांगडी करण्यात आली खरी; पण दोन तासांच्या आतच हा बदलीचा निर्णय कायम ठेवतानाच बहुचर्चित शिना बोरा हत्येच्या तपासावर देखरेखीचे काम मात्र मारियांकडेच ठेवले गेले. बदलीचा संबंध शिना हत्येच्या तपासाशी जोडून माध्यमांनी टीकेची झोड उठवल्याने जपानच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून ही चक्रे फिरवली. प्रतिमा वाचवण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी हे केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे मारिया प्रचंड नाराज आहेत. आज ते राजीनामा देऊ शकतात अशी माहिती समोर आली होती. परंतु, त्यांनी राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पण मी नाराज आहे, हे मात्र त्यांनी कबुल केले आहे.

शिना बोरा प्रकरणी मारिया यांनी तपासात जास्तच रस घेतला होता. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस नाराज होते. पीटर मुखर्जी कुटुंबीयांच्या मालकीच्या माध्यम कंपन्यांत देशातील एका बड्या उद्योगपतीचा पैसा असून तपासादरम्यान मारिया त्या धाग्यापर्यंत पोहोचले. मारियांना ३० सप्टेंबरला महासंचालकपदी बढती मिळणे अपेक्षित होते. मात्र तीन आठवडे आधीच महासंचालकपदी (होमगार्ड) पदोन्नतीवर त्यांची बदली करण्यात आली आणि तपासावरून त्यांना हटवण्यात आले, अशी टीकेची झोड सुरू झाली. त्यामुळे सरकारच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. अखेर आपली अब्रू वाचविण्यासाठी शिना बोरा हत्येच्या तपासावर मारियाच निगराणी ठेवतील, असे जाहीर करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे. या खुलाशामुळे मारिया यांची तडकाफडकी झालेली बदली शिना बोरा प्रकरणावरूनच झाली असल्याचे सरकारने अप्रत्यक्षपणे कबूल केल्याचे मानले जात आहे.

वेळ मारून नेण्याची सरकारची रणनीती
शिना हत्या प्रकरणाचा तपास जवळपास आटोपला आहेच. आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रियाही लवकरच सुरू होणार अाहे. अशा वेळी जनतेला दाखवण्यापुरते आणि माध्यमांच्या टीकेची धार कमी करण्यासाठी या तपासावर मारियांची निगराणी राहील, अशी घोषणा करून वेळ मारून नेण्याची रणनीती आखण्यात आली, असे राज्य मंत्रिमंडळातील एका सदस्याने सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून या सूचना दिल्याने अखेर रात्री राज्य सरकारला आपल्याच निर्णयात बदल करावा लागला आहे.

ललित गेटपासून मारिया यांचे आसन अस्थिर
मारियांनी लंडनमध्ये ललित मोदी यांची भेट घेतली होती. त्याच वेळी त्यांना हटवण्याची सरकारची इच्छा होती. मात्र, पुढे सुषमा स्वराज व वसुंधराराजेंचा राजीनामा घ्यावा लागला असता. त्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची अडचण झाली असती. त्यामुळेच मारियांची खुर्ची शाबूत राहिली असती.
पुढील स्लाईडवर वाचा, शरद पवार यांच्याशी जवळीक नडली... पोलिस दलात तीव्र नाराजी....