आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sheena Murder Case: Sheenas 2012 Samples Dont Match With Recent Remains

शीना मर्डर केसमध्ये नवीन ट्‍वीस्ट? मेळ खात नाहीत \'बॉडी सॅम्पल्स\'!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बहुचर्चित शीना बोरा मर्डर केसमध्ये नवीन 'ट्‍वीस्ट' आला आहे. तो म्हणजे, तीन वर्षांपूर्वी अर्थात 2012 मध्ये सापडलेले बॉडी सॅम्पल्स आणि आता सापडले बॉडी सॅम्पल्स मेळ खात नसल्याची माहिती समोर आली आहे.

बीवायएल नायर हॉस्पिटलच्या फॉरेंसिक एक्स्पर्ट्सनी खार पोलिसांना एक अहवाल सुपुर्द केला आहे. अहवालानुसार, 2012 मध्ये पेणमधून मिळालेले बॉडी सॅम्पल्स हे जेजे हॉस्पिटलद्वारा सोपवण्यात आलेल्या अहवालाशी जुळत नाही. यातील काही सॅम्पल्स गायब झाल्याचे नायर हॉस्पिटलच्या एक्स्पर्ट्सनी म्हटले आहे. त्यामुळे शीना बोरा हत्याकांडाचा गुंता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पोलिसांच्या तपासावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नायर हॉस्पिटलने 26 पानांचा अहवाल खार पोलिसांकडे सोपवला आहे. अहवालातील गोंधळ दूर करण्यासाठी आता पोलिसांनी जेजे बोन्समधून डीएनए प्रोफाइलिंग देखील मागवले आहे.
दरम्यान, शीना मर्डरप्रकरणी मीडिया जगतातील नामी हस्ती पीटर मुखर्जी यांची पत्नी इंद्राणी मुखर्जीला पोलिसांनी अटक केली आहे.

आतापर्यंतचा तपास... शीना ही इंद्राणीचीच मुलगी
शीनाचा चेहरा पेणमध्ये सापडलेल्या कवटीशी जुळला होता. तसेच शीना व इंद्राणीचे डीएनए जुळले होते. कालिना येथील फॉरेन्सिक लॅबने तसा अहवाल मुंबई पोलिसांना दिल्याने शीना ही इंद्राणीचीच मुलगी असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे 2012 मध्ये पेणमध्ये सापडलेली हाडे शीनाचीच असल्याचे स्पष्ट झाले होते. त्याचप्रमाणे मिखाईल याचेदेखील डीएनए इंद्राणीशी जुळले होते. परंतु, आता सापडलेली हाडे आधीच्या अहवालाशी मेळ खात नसल्याचे नायर हॉस्पिटलच्या एक्स्पर्ट्‍सनी म्हटले आहे.

पोलिसांनी फेटाळले सर्व आरोप...
शीना हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी मिळवलेल्या बॉडी सॅम्पल्स मेळ घात नसल्यामुळे पोलिसांच्या तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्‍यात येत आहे. मात्र, पोलिसांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पोलिसांनी तपासकामात कोणताही कसूर ठेवला नाही. पोलिसांना आढळून आलेले डाव्या हाताचे हाड, दोन दांत, जळालेल्या शरीराचे कातडे व केस हे सॅम्पल्स जेजे हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले होते. मृत व्यक्तीचे उम्र, लिंग व मृत्यूचे कारण यासंदर्भात तत्काळ माहिती मिळावी हा त्यामागील उद्देश होता. तसेच या प्रकरणी चौकशी सुरु झाल्यानंतर 2012 मध्ये सापडले सॅम्पल्स सुरक्षित असल्याचे जेजे हॉस्पिटलच्या सूत्रांनी म्हटले होते. 28 ऑगस्टला हे सॅम्पल्स खार पोलिसांना सोपवण्यात आले होते.

नायर हॉस्पिटलच्या एक्स्पर्ट्‍सच्या मते, पेण पोलिसांनी केलेल्या चौकशीचा अहवाल आणि पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये ज्या सॅम्पल्सचा उल्लेख आला आहे, ते आणि आताचे सॅम्पल्स जुळत नाही. त्यात प्रचंड भिन्नता आहे. सॅम्पल्स दोन वेगवेगळ्या बॉडीचे असल्याचे स्पष्ट होत आहे.

एका डॉक्टरने सांगितले की, जेजे हॉस्पिटलने खार पोलिसांना अनेक दात व छातीच्या हाडांची तुकडे, केस व अर्धी जळालेली स्कीन सापडले होते. मात्र, या सॅम्पल्सचा पेण पोलिसांच्या रिपोर्टमध्ये उल्लेख नाही. जेजे हॉस्पिटलने 2012मध्ये व 2015 मध्ये सापडलेले सॅम्पल्स खार पोलिसांना सुपुर्द करताना कोणतेही दस्ताऐवज बनवलेले नाही. यावरून असे स्पष्‍ट झाले की, दोन्ही सॅम्पल्स हे वेगवेगळी आहेत.

काय म्हणाले जेजे हॉस्पिटलचे डॉक्टर्स...
दुसरीकडे, पेण पोलिसांनी जे सॅम्पल्स दिले होते, तेच खार पोलिसांना सुपुर्द करण्‍यात आल्याचे जेजे हॉस्पिटलच्या डॉक्टर्सनी सांगितले आहे. जेजे हॉस्पिटलचे डॉ. दीपक जोशी यांनी संपर्क साधला असता, ते शहराबाहेर आहेत. नेमका काय प्रकार झाला ते आधी पाहावे लागेल, असे डॉ. दीपक जोशी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, 2012 मध्ये पेण पो‍लिसांनी जेजे हॉस्पिटलमध्ये बॉडीचे सॅम्पल्स चाचणीसाठी दिले होते. परंतु, त्यातून ठोस अशी माहिती समोर आली नव्हती. पोलिसांनी दिलेल्या सॅम्पल्सवरून मृत व्यक्तीचे वय, लिंग व मृत्यूचे कारण सांगणे शक्य नसल्याचे 2013 मध्ये हॉस्पिटलने सांगितले होते.

पुढील स्लाइडवर वाचा, अशी झाली होती शीनाची हत्या...