आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ड्रायव्हरने सांगितले - \'इंद्राणीनेच शीनाचा दाबला होता गळा\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंद्राणीसह तिचा दुसरा नवरा संजीव खन्नाने कारमध्ये शीनाचा खून केला असल्याचे श्यामवरने सांगितले.  इंद्राणी मुखर्जी (फाइल फोटो) - Divya Marathi
इंद्राणीसह तिचा दुसरा नवरा संजीव खन्नाने कारमध्ये शीनाचा खून केला असल्याचे श्यामवरने सांगितले. इंद्राणी मुखर्जी (फाइल फोटो)
मुंबई - इंद्राणीमुखर्जी हिनेच तिची मुलगी शिना बोरा हिची गळा दाबून हत्या केली. यासाठी तिचा पूर्वीचा पती संजीव खन्ना याने तिला मदत केली, असा कबुलीजबाब माफीचा साक्षीदार झालेला इंद्राणीचा चालक श्यामवर रॉय याने दिला आहे.

उच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर रॉय याने दिलेल्या जबाबाची प्रत विशेष सीबीआय न्यायालयात शुक्रवारी ठेवण्यात आली. शिना बोरा हत्याकांडात रॉय याला ऑगस्ट २०१५ मध्ये अटक करण्यात आली. या प्रकरणात इंद्राणी मुखर्जी मुख्य आरोपी असून तिचा पती पीटर मुखर्जी आणि पूर्व पती संजीव खन्ना सहआराेपी आहेत. काही दिवसांपूर्वी रॉय याला माफीचा साक्षीदार बनवण्यास न्यायालयाने मान्यता दिली आहे. त्यानुसार राॅयचा कबुली जबाब घेतला जात अाहे.

'मॅडमने मला तीन महिन्यांच्या पगारी सुटीवर पाठवले होते'
- पीटर मुखर्जी हा स्टार इंडियाचा सीईओ होता. तर त्याची पत्नी इंद्राणी आयएनएक्स मीडियाची सीईओ होती.
- शीना ही इंद्राणीला पहिल्या नवऱ्यापासून झालेली मुलगी होती. तर संजीव खन्ना हा तिचा दुसरा नवरा होता. त्याला सोडल्यानंतर इंद्राणीने पीटरसोबत लग्न केले होते.
- रायने दिलल्या जबाबानुसार, 24 एप्रिल 2012 रोजी एका कारमध्ये इंद्राणीने शीनाचा खून केला होता.
- 'त्यावेळी कारमध्ये इंद्राणी, श्यामवर आणि तिचा दुसरा नवरा संजीव खन्ना होता.'
- रायने सांगितल्यानुसार, 'संजीवने शीनाला दाबून धरले होते, तर श्यामवरने तिचे तोंड दाबले होत आणि इंद्राणीने तिचा गळा दाबला होता.'
- शुक्रवारी सीबीआय स्पेशल कोर्टाने श्यामवरच्या जबाबाची कॉपी इंद्राणी आणि पीटरलाही दिली.
- सीबीआय स्पेशल कोर्टने 20 जून रोजी रायला शीना मर्डरकेसमध्ये सरकारी साक्षीदार होण्याची परवानगी दिली होती.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, शीना बोरा...
बातम्या आणखी आहेत...