आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे अब्जाधीश उद्योगपतीची माजी पत्नी, सासूनेच पाठवले होते तुरुंगात!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शीतल मफतलाल- फाईल फोटो - Divya Marathi
शीतल मफतलाल- फाईल फोटो
मुंबई- 100 कोटींची पेटिंग्ज चोरल्याप्रकरणी अब्जाधीश उद्योगपती अतुल्य मफतलाल यांची माजी पत्नी शीतल मफतलाल हिच्याविरोधात एफआयआर दाखल झाला आहे. शीतलवर पेटिंग्ज चोरल्याची खोटी तक्रार दाखल केल्याचे बोलले जात आहे. मफतलाल परिवारातील पेटिंग्जच्या चोरीप्रकरणी आता एक नवे वळण मिळाले आहे. यापूर्वीही शीतल मफतलाल हिच्यावर चोरीचे आरोप झाले आहेत. 2009 मध्ये शीतलला चोरीच्या 50 लाख रूपयांच्या ज्वेलरीसह मुंबई विमानतळावर पोलिसांनी अटक केली होती.
सासू आणि दीराने घडवून आणली अटक-
कस्टम विभागाला मफतलाल परिवारातील कोणीतरी टिप दिली होती की, 50 लाखाची ज्वेलरी घेऊन मुंबई एयरपोर्टवरून शीतल विदेशात चालली आहे. याच टीपच्या आधारे शीतलला मुंबई एयरपोर्टवर अटक केली होती. त्यावेळी तिच्याकडून 50 लाखांचे दागिने हस्तगत केले होते. त्यानंतर तिला तुरुंगातही टाकले होते. त्यानंतर खुलासा झाला की, शीतलची सासू माधुरी मफतलाल आणि दीराने पोलिसांना आणि कस्टमला टीप दिली होती.
कोण आहे शीतल-
मुंबईतील उद्योगपती अतुल्य मफतलालची शीतल ही दुसरी पत्नी आहे. मात्र, या दोघांचा घटस्फोट झाला आहे. सध्या मफतलाल लग्झरी इंडस्ट्रीजची शीतलवर जबाबदारी टाकली गेली आहे. ती कंपनीची अध्यक्ष आहे. रजनी आणि मनोहर भगत यांची मुलगी शीतल मुंबईतील पेज 3 मधील सेलेब राहिली आहे. भगत परिवार निरलॉन फॅब्रिक आणि कन्वेयर बेल्ट बनवतो. लग्नाआधी शीतल मॉड्यूलर किचनचा स्वत:चा व्यवसाय संभाळत असत.
पुढे, स्लाईड्सच्या माध्यमातून पाहा, शीतलचे निवडक फोटोज...