आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेंद्रा-बिडकीन डीएमआयसी टप्प्याचा लवकरच शुभारंभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरीडॉर (डीएमआयसी) सर्वप्रथम महाराष्ट्रात कार्यान्वित करण्यासाठी शेंद्रा-बिडकीनचा पहिला टप्पा लवकर सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या आढावा बैठकीत दिल्या.

प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, औरंगाबाद, पुणे, नगर, धुळे व नंदूरबार जिल्हे औद्योगिकदृष्ट्या राजधानी दिल्लीशी जोडले जाणार आहेत. यामुळे औद्योगिकदृष्ट्या अविकसित भागांचाही विकास शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तांत्रिक बाबींची पूर्तता करून प्रकल्प मार्गी लावण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.


विश्वासात घेऊ : राणे
शेंद्रा येथे 751 हेक्टर भूसंपादन झाले असून, 2500 हेक्टर जमीन घेण्यात येणार आहे. दिघी येथे अद्याप भूसंपादन कार्यवाही झाली नसली तरी स्थानिकांना विश्वासात घेऊन प्रकल्पाचा प्रयत्न केला जाईल, असे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी बैठकीत सांगितले.