मुंबई - योगगुरू बाबा रामदेव आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी बुधवारी एका योग शिबिरात भाग घेतला. या दोघांनीही नागरिकांना योगाचे धडे दिले आणि महत्त्व समजावून सांगितले. मात्र, सोशल मीडियामधून या दोघांचे योग करतानाचे फोटो व्हायलर झाले असून, त्यातून चांगलीच थट्टा उडवली जात आहे.
कार्यक्रमात शिल्पाने काय केले...
- शिल्पाने आपल्या ‘ग्रेट इंडियन डाइट’ या योगावर लिहिलेल्या पुस्तकाचे बाबा रामदेव यांच्या हस्ते प्रकाशन केले.
- योगा करताना तिने रामदेवबाबांसोबत अनेक सेल्फी घेतल्या, नंतर त्यांना आपल्या Instagram अकाउंटवर शेअर केले.
- 'रामदेव बाबांनी दिलेला आशीर्वाद आणि प्रोत्साहानामुळे माझा उत्साह वाढला', असे ट्वीटही तिने केले.
- व्यासपीठावर रामदेवबाबांनीही शिल्पाचे कौतुक केले.
सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया उमटल्या...
- शिल्पा शेट्टीने रामदेवबाबांसोबत योगा नाही तर एरोबिक्स केला आहे- @rega (Twitter)
- रामदेवबाबा शिल्पासोबत असा योगा करत आहेत की त्यांचे पाय उन्हात पोळत आहेत. - @RowdyFellow
- शिल्पाकडे चित्रपट नाहीत त्यामुळे या पद्धतीने ती आता टीव्हीवर येत आहे. @Ronak_kamat
पुढील स्लाइड्सवर पाहा, शिल्पा शेट्टी आणि रामदेवबाबा यांचे योगा करतानाचे व्हायलर झालेले PHOTOS .....