आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिना बोरा हत्याकांड : इंद्राणीच्या पतीची मागणी आत्मचरित्रासाठी पीटर मुखर्जीला हवा लॅपटॉप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : शिना बोरा हत्या प्रकरणात पत्नी इंद्राणीसोबत तुरुंगात असलेल्या पीटर मुखर्जीने आत्मचरित्र लिहिण्यासाठी लॅपटॉपची मागणी केली आहे. यासाठी त्याने सीबीआय न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
मला आत्मचरित्र लिहायचे आहे. त्यामुळे तुरुंगात इंटरनेट जोडणीशिवाय लॅपटॉप हवा आहे,असे न्या. एच.एस. महाजन यांना केलेल्या अर्जात नमूद केले आहे. अर्जात पीटरने हाताने लिहिणे जड जात असल्याचे म्हटले. लॅपटॉप दिल्यास दिवसातून ४ तास त्याचा वापर करीन व नंतर तो तुरुंग प्रशासनाकडे देईन.
मी ६१ वर्षांचा आहे. अधूमधून विस्मृतीचा त्रास होतो. त्यामुळे लॅपटॉपमुळे काम हलके होईल,असे पीटरचे म्हणणे आहे. त्याने पुतणीच्या बंगळुरूतील लग्नाला हजर राहण्यासही परवानगी मागितली. पीटरच्या अर्जावर सीबीआय १४ डिसेंबर रोजी उत्तर सादर करेल. शिना बोरा हत्या प्रकरणात १९ डिसेंबर रोजी न्यायालय युक्तिवाद ऐकण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...