आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिना इंद्राणीला ब्लॅकमेल करत असल्‍याचा दावा, शिनाची कागदपत्रे सीबीआयकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिना बोरा हत्या प्रकरणाच्या तपासात सीबीआयच्या हाती महत्त्वाचा दुवा लागला आहे. शिनाचा प्रियकर व पीटर मुखर्जीचा मुलगा राहुलने शिनाकडील महत्त्वपूर्ण कागदपत्रे रविवारी सीबीआयकडे सुपूर्द केली. या कागदपत्रांच्या अाधारेच शिना आई इंद्राणीला ब्लॅकमेल करत होती, असा दावा केला जात आहे.

आरोपींच्या विराेधात सबळ पुरावे म्हणून या कागदपत्रांचा वापर करता येईल, अशी सीबीआयची अटकळ आहे. एका सीबीआय अधिकाऱ्यानुसार, शिनाने आई इंद्राणीकडे मुंबईत तीन बेडरूमच्या फ्लॅटची मागणी केली होती. तो खरेदी करून न दिल्यास आपण तुझी बहीण नसून मुलगी आहोत, याची माहिती सर्वांसमोर उघड करण्याची धमकी शिनाने दिली होती.

सीबीआयला हवी पीटरची कोठडी : सीबीआयने गुरुवारी पीटर मुखर्जीला अटक केली होती. शुक्रवारी त्याच्यावर हत्येच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवला. कोर्टाने त्याला सोमवारपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली. सोमवारी त्याला न्यायालयात हजर करून पुन्हा कोठडी मागितली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. शिना बोरा प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. त्‍यामुळे या प्रकरणाची आणखी चर्चा वाढली आहे.