आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिना बोरा हत्‍याकांड: राहुल व पीटरदरम्यानचे ई मेल संभाषण उघड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिना बोरा हत्याप्रकरणात सर्वात शेवटी अटक झालेल्या पीटर मुखर्जी भोवतीचे संशयाचे धुके अधिक गडद होत चालले आहे. पीटर आणि त्याचा मुलगा राहुल यांच्यादरम्यान शिना बेपत्ता झाल्यानंतर इमेलद्वारे जे संभाषण झाले त्यावरून पीटरला शिनाच्या बेपत्ता होण्यामागचे खरे कारण माहीत होते, या निष्कर्षापर्यंत तपास यंत्रणा आली आहे. तसा उल्लेखच सीबीआयने आपल्या आरोपपत्रात केला आहे. तसेच शिनाच्या हत्येमागे इतर कोणताही नव्हे तर फक्त संपत्तीचा वादच कारणीभूत असल्याचा दावाही सोमवारी सीबीआयने न्यायालयात केला आहे.

एप्रिल २०१२ मध्ये शीनाच्या अचानक बेपत्ता होण्यामागे काहीतरी मोठे गूढ असल्याचा संशय राहुल मुखर्जीला होता. त्याने त्यावेळी आपला हा संशय आपले वडील पीटर मुखर्जी यांच्याकडे व्यक्तही केला. शिना अचानक कुठे गेली याबाबत तिच्या मित्रमैत्रिणी आपल्याकडे विचारणा करत असल्याचे राहुलने पीटरला सांगितले होते. तसेच तिच्या फोनवरून कोणतीही प्रतिसाद मिळत नाही, विशेष म्हणजे २१ एप्रिलपासून तिच्या फेसबुक अकाऊंटवरही काहीच हालचाल दिसत नसल्याबद्दलही राहुलने पीटरकडे आश्चर्य व्यक्त केले होते. मात्र तिच्या शोधात तू उगाच आपला वेळ वाया घालवू नकाेस, असा सल्ला पीटरने राहुलला दिला होता. तसेच तिने तुझ्याशी खेळ केला आणि आता कुणालाही न सांगता ती अचानक कुठेतरी निघून गेली आहे. तिला खरोखरच तुझ्याशी काही बोलायचे असेल तर कदाचित ती तुझ्याशी भविष्यात संपर्क साधेल, असेही पीटरने या इमेलद्वारे झालेल्या संवादात म्हटले आहे. राहुल आणि पीटर यांच्या दरम्यान २७ मे २०१२ रोजी ई मेलच्या माध्यमातून झालेल्या या संवादाचा उल्लेख सीबीआयने आपल्या आरोपपत्रात केला आहे.
पीटरच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ
पीटरला दिलेल्या पोलिस कोठडीची मुदत सोमवारी संपत असल्याने त्याला सत्र न्यायालयात हजर केले असता त्याच्या पोलिस कोठडीची मुदत २६ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. सीबीआयने अधिक तपासासाठी आणखी दहा दिवसांची पोलिस कोठडी वाढवून देण्याची मागणी न्यायालयात केली होती.