आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिनाच्या नावे सिंगापूरच्या बँक खात्यात मोठी रक्कम : सीबीआयचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिना बोरा हत्या प्रकरणात गुरुवारी एक नवा खुलासा झाला आहे. माध्यमसम्राट पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांनी आपल्या मालकीच्या "नाइन एक्स मीडिया प्रा. लि.' या कंपनीतील पैसा नियमबाह्य पद्धतीने परदेशातील काही बेनामी बँक खात्यांमध्ये वळवला असून त्याची अधिक चौकशी करण्याची गरज असल्याचा दावा सीबीआयने गुरुवारी महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर केला. यासाठी आपल्याला इंटरपोलची मदत लागणार असल्याचेही सांगण्यात आले. तसेच शिनाच्या नावे सिंगापूरमध्ये इंद्राणीने एक बँक खाते उघडल्याची बाब पीटरने चौकशीदरम्यान उघड केल्याची माहितीही सीबीआयने न्यायालयाला दिली. त्यावर महानगर दंडाधिकाऱ्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत पीटरची सीबीआय कोठडी वाढवून दिली.

पीटर मुखर्जीच्या सीबीआय कोठडीची मुदत गुरुवारी संपत असल्याने त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान सीबीआयने पीटर मुखर्जीची कोठडी सात दिवसांनी वाढवण्याची मागणी केली. न्यायालयात केलेल्या युक्तिवादादरम्यान सीबीआयने पीटर तसेच इंद्राणीशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारांवर प्रकाश टाकला. सन २००६-०७ या आर्थिक वर्षात मुखर्जी दांपत्याने "आयएनएक्स मीडिया' या कंपनीच्या माध्यमातून तब्बल ९०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

या कंपनीच्या आर्थिक व्यवहारांवर लेखा परीक्षणादरम्यान ठपका ठेवण्यात आला आहे. यापैकी बराचसा पैसा सिंगापूरच्या एचएसबीसी बँकेतील शिनाच्या नावे उघडलेल्या खात्यात गेल्याचा दावा सीबीआयने न्यायालयात केला.
हे खाते उघडण्यासाठी इंद्राणीला सिंगापूरच्या डीबीएस बँकेतील एक कर्मचारी असलेल्या गायत्री आहुजा यांची मदत झाली असून या सर्व व्यवहारांची चौकशी करण्यासाठी इंटरपोलशी पत्रव्यवहार करण्यात आला असल्याचे सीबीआयने न्यायालयाला सांगितले. विशेष म्हणजे चौकशीदरम्यान पीटरनेही शिनाच्या या बँक खात्याबाबत खुलासा केल्याचा दावा सीबीआयने केला आहे.
पुढील स्‍लाइड्सर क्‍लिक करून वाचा.. आणखी कोणते खुलासे होणार ?.. इंद्राणीने सांगितले, शिनाचा तपास करू नका.. पीटरची लाय डिटेक्टर तपासणी होणार..