आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिना बोरा हत्याप्रकरणी मारियांकडून दिशाभूल; CM च्या खुलाशाने बदलीचे गूढ उलगडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिना बोरा हत्या प्रकरणात मुंबईचे तत्कालीन पोलिस अायुक्त राकेश मारिया यांनी आपली दिशाभूल केली होती, असा धक्कादायक खुलासा खुद्द मुख्यमंत्र्यांनी केला. या प्रकरणात पीटर मुखर्जीचा सहभाग नसल्याची माहिती मारिया यांनी तेव्हा दिली होती, असे मुख्यमंत्री म्हणाले. ‘वर्षा’वर दिवाळीनिमित्त आयोजित स्नेहभोजनानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. या खुलाशामुळे वर्षभरापूर्वी मारिया यांच्या झालेल्या तडकाफडकी बदलीमागचे कारण उघड झाले.
मुंबईत शिना बोरा हत्या प्रकरण ऑगस्ट २०१५ मध्ये उघडकीस आले. त्यानंतर खुद्द मारिया यांनीच तपासाची सूत्रे हाती घेतली होती. मारियांनी या तपासात घेतलेला अतिरिक्त रस तेव्हा चर्चेचा विषय झाला होता. मात्र तपास ऐन भरात असतानाच अचानक मारिया यांची मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली.या तडकाफडकी बदलीमुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले. शिना बोरा हिच्या हत्येमध्ये इंद्राणी मुखर्जीच्या पतीचा म्हणजे पीटर मुखर्जीचा सहभाग नसल्याची माहिती मारियांनी तेव्हा दिली होती, असे मुख्यमंत्री म्हणाले. नंतरच्या काळात सीबीआय तपासादरम्यान पीटर याला सर्व माहिती होती, असे उघड झाले होते.

... मग ती भूमिका का?
मारियांच्या बदलीनंतरही तेच हा तपास करतील, अशी भूमिका गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी तेव्हा का स्पष्ट केली होती, असा सवाल महाराष्ट्र पोलिस सेवेतील मारिया यांच्या एका निकटवर्तीय वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना केला.
बातम्या आणखी आहेत...