आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shina Murder Case And Mumbai Police Commissioner Rakesh Mariya Promotion

शीना मर्डर केस: मारियांचा \'गेम\' की \'पदोन्नती\', जाणून घ्या त्यांना असे केले दूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या दीड महिन्यांपासून गाजत असलेले शीना बोरा हत्याकांड शांत झाले आहे. हे प्रकरण चर्चेतूनच काय तर मीडियातून बाहेर होण्याच्या टप्प्यात आहे. देशभरात खळबळ उडवून देणार्‍या शीना मर्डर केसचा तपास अंतिम टप्प्यात येतो न येतो, तोच जातीने लक्ष घालून तपास करणारे आयपीएस अधिकारी आणि मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांना 'प्रमोशन'च्या नावाखाली सरकारने या प्रकरणातून अगदी सहज बाजुला केल्याने कुठे तरी पाणी मुरत असल्याचे दिसत आहे.

मारियांना 30 सप्टेंबरला महासंचालकपदी प्रमोशन मिळणे अपेक्षित होते. मात्र, तीन आठवडे आधीच त्यांना महासंचालकपदी (होमगार्ड) पदोन्नती देण्यात आली आणि तपासावरून त्यांना हटवण्यात आले, अशी सरकारवर टीकेची झोडही उठली आहे. मात्र, आता मारिया यांचे हे प्रमोशन आहे की डिमोशन? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.

राकेश मारिया शिना बोरा प्रकरण हाताळत होते. 'चॅनलपुरुष' पीटर मुखर्जी कुटुंबियांच्या मालकीच्या माध्यम कंपन्यांत देशातील एका बड्या उद्योगपतीचा पैसा असून तपासादरम्यान मारिया त्या धाग्यापर्यंत पोहोचले होते. तपासात आणखी काही माहिती समोर आली तर आपले पितळ उघडे पडेल, या भीतीने इंद्राणी व पीटर मुखर्जीच्या शिफारशीनंतर राज्य सरकारने ठरवून मारियांचा 'गेम' केला, अशी चर्चा सुरु आहे.
मागील दीड महिनांपासून सहा विशेष अधिकारी या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. विशेष म्हणजे राकेश मारिया यांनी स्वत: तपासात जातीने लक्ष घातले होते आणि सप्टेंबर अखेरपर्यंत तपास पूर्ण करून खटला दाखल केला जाईल, असा विश्वासही व्यक्त केला होता. परंतु, गणेश उत्सवातील बंदोबस्तांचे कारण पुढे करून गृहमंत्रालयाने राकेश मारिया यांना या केसमधून बाजूला केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जपान दौर्‍यावर असताना त्यांच्या गैरहजेरीत या सगळ्या गोष्टी घडल्या. कारण, मुख्यमंत्री स्वत: मारियांवर नाराज होते. पण या पदोन्नतीवरुन गदारोळ झाल्यानंतर शीना मर्डर केसला तपास मारियांच्याच हाती राहिल, असे सांगण्यात आले. त्यावर जोपर्यंत याचा लिखित आदेश मिळत नाही तोपर्यंत मी तपास करणार नाही, असे मारियांनी यावेळी स्पष्ट केले. अद्याप मारिया यांना अशा प्रकारचा आदेश मिळालेला नाही. त्यावरुन त्यांना तपासावरुनच दूर करायचे होते हे सिद्ध होते.

राज्यात एखाद्या पोलिस अधिकार्‍याची बदली होणे, ही काही नवी गोष्ट नाही. एखादा महत्त्वाचा तपास सुरु असतानाही त्यातील पोलिस अधिकाऱ्याला दूर केले जाते. त्याच्यामागे बऱ्याच प्रकारचे राजकारण असते. पण जेव्हा स्वतः पोलिस आयुक्त एखाद्या प्रकरणाचा तपास करीत असेल. तेव्हा त्याला पदोन्नतीच्या नावाखाली दूर करणे ही राज्यातील कदाचित पहिलीच घटना आहे.
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, मारियांवर नाराज होते मुख्यमंत्री फडणवीस... का त्यांना तपासावरुन दूर करण्यात आले...