आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शीना हत्‍याकांड दडपण्‍यासाठी विदेशात आर्थिक देवाणघेवाण; मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - हाय प्रोफाइल शीना बोरा हत्‍याकांड दडपण्‍यासाठी राज्याबाहेर आणि देशाबाहेर आर्थिक देवाणघेवाण झाली होती. त्‍यामुळेच आपण या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपला, असा गौप्‍यस्‍फोट खुद्द मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्‍यामुळे या प्रकरणाची गुंतागुंत वाढली आहे. मात्र, आर्थिक देवाण-घेवाण कुणी केली, याच स्‍पष्‍ट उत्‍तर त्‍यांच्‍याकडून मिळाले नाही. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांच्या बदलीमुळे सरकारच्या हेतूवर प्रश्न उपस्‍थि‍त केले जात होते. त्‍यावर मुख्‍यमंत्र्यांनी हा गौप्‍यस्‍फोट केला.
 
आरोपींच्‍या न्‍यायालयीन कोठडीत वाढ
या प्रकरणात अटकेत असलेली शीनाची आई  इंद्राणी मुखर्जी, सावत्र वडील संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्याम राय यांची न्यायालयीन कोठडी 5 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या तिन्ही आरोपींवर शीना बोराच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला असून, डीएनए टेस्ट आणि इतर पुरावेही या तिन्ही आरोपींविरोधात आहेत.

पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, कोणते प्रश्न अजूनही अनुत्तरित...