आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shinde Should Be Criminal, Pravin Wategaonkar Filed PIL In High Court

शिंदे यांनाही ‘आदर्श’मध्ये आरोपी करण्‍यासाठी प्रवीण वाटेगावकर यांची हायकोर्टात याचिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचाही वादग्रस्त आदर्श गृहनिर्माण सोसायटीत बेनामी फ्लॅट आहे, असा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी शुक्रवारी याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. शिंदेंनाही या प्रकरणात आरोपी करावे, असे निर्देश न्यायालयाने सीबीआय व अंमलबजावणी संचालनालयाला द्यावेत, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.


शहीद जवानांसाठी राखीव असलेल्या जागेवर नियम डावलून 31 मजली आदर्श गृहनिर्माण सोसायटी उभारली, असा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह काही राजकीय नेते व सनदी अधिका-यांवर आहे. या सदनिका खरेदी व्यवहारात मनी लॉँडरिंग कायद्याचा भंग झाल्याचा आरोप करत वाटेगावकर यांनी यापूर्वीच जनहित याचिका दाखल केली आहे.


याचिकेत म्हटले आहे की, मुख्यमंत्रिपदी असताना सुशीलकुमार शिंदे यांनी मेजर एन. खानखोजे यांना सोसायटीचे सदस्यत्व देण्याची शिफारस केली होती. सोसायटीचे दिवंगत सदस्य व माजी आमदार कन्हैयालाल गिडवाणी यांनी याबाबत चौकशी आयोगाकडेही माहिती दिली होती. तसेच दिवंगत मेजर खानखोजे यांचे पुत्र किरण यांनीही आयोगाकडे या माहितीला दुजोरा दिला आहे.


‘माझ्या वडिलांनी सोसायटीसाठी अर्ज केला होता. मात्र ठरलेली रक्कम ते जमा करू शकले नाहीत. त्यामुळे सदस्यत्व अपात्र ठरवण्यात आले. मात्र, तरीही शिंदेंनी सदस्यत्व देण्याची शिफारस केली होती. तसेच माझ्या वडिलांनी नंतर फ्लॅटबाबत आम्हाला काहीही सांगितले नाही,’ असे किरण यांनी नमूद केले आहे. त्यामुळे या फ्लॅटसाठी कोणी रक्कम दिली, त्याची चौकशी करावी व सीबीआयने शिंदेंना आरोपी करावे, अशी मागणी याचिकेत केली आहे.